"विवेकानंद विद्यालय नरवेल येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न"। अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक-:- हेमकांत गायकवाड) मलकाप...
"विवेकानंद विद्यालय नरवेल येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न"।
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- विवेकानंद विद्यालय ,नरवेल तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील सन १९८७/८८ मधील इयत्ता दहावीच्या बॅचचा' माजी विद्यार्थी मेळावा 'नुकताच पद्मश्री मंगल कार्यालय, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला .मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध डॉक्टर मा. जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेत दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील माजी सभापती मा. श्री किरण भाऊ कोलते मा.श्री किशोर कोलते मा. श्री येवले साहेब ,श्री मोरे सर उपस्थित होते .स्वागत समारोह कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रास्ताविक भाषण डिझायर कोचिंग क्लासेस खामगावचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दामोदर दांडगे यांनी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थी सोबत असून त्यावेळच्या गम्मती जमती व गरिबीतून कसे शिक्षण घेत मोठे झालो ते सांगितले त्यानंतर पोलीस विभागात कार्यरत श्री रामचंद्र भोपळे यांनी त्यांच्या विनोदी शैलीतून शालेय जीवनाची वस्तू स्थिती मांडली. मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक अरुण राणे यांनी आपल्या मनोगतात शेरोशायरी करत मनोरंजन केले व दरवर्षी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे वर्गमित्र मैत्रिणींना आवाहन केले. पाटबंधारे विभागातील इंजिनियर श्री नीलकंठ कांडेलकर यांनी 'एकदा परत भेटू 'ही स्वरचित सुंदर कविता सादर केली .पुणे येथून आलेले श्री संजय किनगे ,श्री जगन्नाथ उन्हाळे, बबीता ताई तसेच जांभूळ धाबा येथील प्रवचनकार कीर्तनकार ह भ प मालतीताई झांबरे ,तळणी येथील रजनीताई नाफडे यांनी आपापली मनोगते मांडली .भुसावळ येथील प्रसिद्ध गायक श्री येवले साहेब यांनी याप्रसंगी अत्यंत सुरस् दोन गाणी गायली. मुक्ताईनगर येथील श्री आनंदा कोळी यांनी एक नृत्य व एक कविता सादर करत कार्यक्रमात उत्साहाचा रंग भरला. श्री अनंत कोलते सविता मोते पाटील ,सविता कोलते पाटील ,यांनी आपापला परिचय करून देत 'एक दिवस मित्रांसाठी' म्हणत माजी विद्यार्थ्यांनी लहानपणीचा अनुभव पुन्हा घेत बकेटमध्ये बॉल टाकणे, संगीत खुर्ची खेळत आनंद व्यक्त केला तसेच या प्रसंगी सर्वांना 'मैत्री सन्मान चिन्ह' देण्यात आली. प्रमुख उपस्थिती माननीय श्री किरण कोलते यांनी आपल्या भाषणामध्ये ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे सात ते आठ वर्षापासून दरवर्षी २५ डिसेंबरला नियोजनबद्ध कार्यक्रम होत असल्याने अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.
अध्यक्षीय भाषणात माननीय डॉक्टर श्री जगदीश पाटील यांनी आरोग्य सांभाळत अशा प्रकारचे कार्यक्रम घेत तुम्ही मनाचे आरोग्य सांभाळत असल्याचे सांगितले .कार्यक्रमाला नामदेव कोलते ,कमलाकर सावळे ,योगेंद्र जोशी ,वंदना कोलते भारंबे ,मधुकर शेलकर, प्रीतम पाटील, शेषराव पाटील ,संतोष कुलकर्णी ,सुभाष कल्याणकर ,छ्गन चौधरी यांची उपस्थित लाभली. अडचणीमुळे काही माजी विद्यार्थी येऊ शकले नाहीत. कार्यक्रमाचे शेरोशायरी व अर्थपूर्ण चारोळ्या सह सूत्रसंचालन व आभार निवृत्ती इंगळे सर यांनी केले शेवटी ग्रुप डान्स व स्नेहभजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments