चोपडा शहरात एकल वापर प्लास्टिक ग्लास, कप वापरण्यावर प्रतिबंध नगरपालिका करणार दंडात्मक कार्यवाही चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड...
चोपडा शहरात एकल वापर प्लास्टिक ग्लास, कप वापरण्यावर प्रतिबंध नगरपालिका करणार दंडात्मक कार्यवाही
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
केंद्र सरकारच्या (Central Government) पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी (Plastic Ban) घातली आहे. आरोग्याला घातक तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर काही वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. परंतु, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने "महाराष्ट्र प्लास्टिक व धर्मोकोल अविघटनशील वस्तूंच्या (उत्पादन, वापर विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८" संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यात आली आहे. या नियम व अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी चोपडा शहरात सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांची विक्री व खरेदी होत आहे. त्यामुळे सरकारने ठरवून दिलेल्या प्लास्टिक पिशव्यांबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन मा. मुख्याधिकारी सो., श्री. राहुल पाटील यांनी केले आहे. प्लास्टिक बंदी, जनजागृती, दंड करुनही शहरात प्लास्टिक विक्री करणाऱ्यां सोबतचे प्लास्टिक वापरही वाढलेला आहे. याकरीता चोपडा नगरपरिषदेने आज दि.०७/०१/२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, मेनरोड परिसर इ. ठिकाणी भेटी देवून प्लास्टिक बंदी केलेले प्लास्टिक कोटींग असलेले डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इ. जप्त केले व एकूण र.रु.९०००/- दंड वसुल केला सदर कारवाई ही शिव समर्थ प्लास्टिक, प्रभाकर नेवे, गुरु खेतेश्वर स्विट, मिलाप स्टोअर्स, बँगलोर बेकरी, हरीओम खेतेश्वर, खेतेश्वर राजस्थान, प्रिया बेकरी इ. दुकानांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना कारवाई दरम्यान कापडी पिशवी वापरणे बाबत आवाहन करण्यात आले.सदरील कार्यवाही ही मा. मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी व एकल वापर प्लास्टिक मोहिमेअंतर्गत चोपडा शहरातील विविध विक्रेता व पुरवठा धारक यांच्याकडे भेट देऊन प्लास्टिक वस्तू व कॅरीबॅग जप्त करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली सदर कार्यवाहीत स्वच्छता निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके, श्री. जयेश भोंगे, श्री.व्हि. के. पाटील, लिपिक श्री. जयंत कपले, शहर समन्वयक स्वप्निल धनगर व मुकादम श्री. सुनिल बाविस्कर, श्री.किशोर पवार, श्री. रिंकु पवार, श्री.राहुल सैंदाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मा. मुख्याधिकारी यांनी दिला आहे.

No comments