adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब चोपडा यांचा स्तुत्य उपक्रम : स्वेटर वाटप,अन्नदान करून पत्रकारांनी केला मुकबधिर विद्यार्थ्यांसोबत 'पत्रकार दिन' साजरा

  भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब चोपडा यांचा स्तुत्य उपक्रम : स्वेटर वाटप,अन्नदान करून पत्रकारांनी केला मुकबधिर विद्यार्थ्यांसोबत 'प...

 भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब चोपडा यांचा स्तुत्य उपक्रम : स्वेटर वाटप,अन्नदान करून पत्रकारांनी केला मुकबधिर विद्यार्थ्यांसोबत 'पत्रकार दिन' साजरा



चोपडा(प्रतिनिधी)- 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

६ जानेवारी हा दिवस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिवस.हा दिवस राज्यभर मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.त्या अनुषंगाने चोपडा येथील मूकबधिर विद्यालयात भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून 'पत्रकार दिन' साजरा करण्यात आला.


       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा विधानसभेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल,भाजपाचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे युवा नेते सागरभाऊ ओतारी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सत्रासेन आदिवासी सेवा मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भादले, मूकबधिर विद्यालयाच्या अध्यक्षा लीलाताई पाकळे, रोटरी क्लबचे प्रोजेक्ट मॅनेजर पवन गुजराथी,भारतीय पत्रकार महासंघाचे केंद्रीय सचिव प्रदीप पाटील,उपाध्यक्ष राकेश कोल्हे, सल्लागार प्रकाश सरदार, दै.बातमीदारचे मुख्य संपादक हेमंत पाटील यांची उपस्थिती होती. 

          आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते यावेळी मूकबधिर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. मूकबधिर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. ज्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही व ऐकू देखील येत नाही अशा विद्यार्थ्यांनी एवढ्या चांगल्या प्रतीचे नृत्य सादर करणे ही एक कलाच आहे,याचे कुतूहल यावेळी उपस्थितांमध्ये होते.भारतीय पत्रकार महासंघाचे केंद्रीय सल्लागार प्रकाश सरदार यांनी मनोगत व्यक्त केले. तर समाजाच्या घटकासाठी काहीतरी करण्याची तळमळ भारतीय पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आजच्या या कार्यक्रमातून दिसून आल्याने पत्रकार नंदलाल मराठे व विलास पाटील यांचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी कौतुक व अभिनंदन केले.

          याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाचे संस्थाचालक भावलाल पाकळे सर, माजी नगरसेवक राजेंद्र जयस्वाल,अनुप जैन,कैलास बाविस्कर, पत्रकार पी आर माळी सर,पत्रकार जितेंद्रकुमार शिंपी,भारतीय पत्रकार महासंघाचे तालुकाध्यक्ष तुषार सूर्यवंशी,तालुका सचिव सचिन जयस्वाल,शहर अध्यक्ष हेमकांत गायकवाड, विनायक पाटील,जितेंद्र कोळी रोटरी क्लबचे एम डब्ल्यू पाटील सर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष चेतन टाटिया,अर्पित अग्रवाल,चंद्रकांत साखरे,पत्रकार डॉ.सतीश भदाणे,डॉ.संजय जाधव,गणेश पैठणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय पत्रकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष विलास पाटील, जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता धनगर, शिक्षिका अश्विनी पाकळे, शिक्षक राकेश पाटील, कलाशिक्षक निलेश महाजन, श्रीमती मीनाक्षी पाकळे,अधीक्षिका श्रीमती वैशाली पाकळे,उमेश धनगर,देविदास धनगर, संतोष धनगर,श्रीमती कविता बाविस्कर, श्रीमती भारती बडगुजर यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मूकबधिर विद्यालयाचे संस्थाचालक भावलाल पाकळे सर यांनी केले.

No comments