पाणंद रस्त्यांपासून एकही गावं वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी :- आमदार चंद्रकांत भाऊ पाटील मुक्ताईनगर /रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (...
पाणंद रस्त्यांपासून एकही गावं वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी :- आमदार चंद्रकांत भाऊ पाटील
मुक्ताईनगर /रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुक्यात शेत शिवार शेत पाणंद रस्त्यासाठी सर्वेक्षणचे काम प्रशासनाने सुरू केले असून या योजनेअंतर्गत शिवशेती रस्ते प्रकल्पाअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील एकही गाव वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी एक ही गांव शेतशिव रस्त्यापासून वंचित राहता कामा नये. मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येक गावामध्ये दवंडी देवून शेतकऱ्यांना माहिती देऊन जनजागृती करावी व ग्रामपंचायतीनी २६ जानेवारीच्या ग्रामसभेत ठराव मंजुर करावे करावे, प्रशासकीय यंत्रणेने यात कोणत्याच गावाचे व कुठलेही पाणंद रस्ते वगळू नये व शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवू नये अशी सक्त सुचना उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मुक्ताईनगर चे आ. चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात आ. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वयक समिती आढावा बैठक झाली. या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या
प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत तालुक्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीला तहसीलदार गिरीश वखारे, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, उपअभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), कृषी अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, दुय्यम निबंधक, पशुवैद्यकीय अधिकारी, आगार व्यवस्थापक, गटशिक्षण अधिकारी, उपअधीक्षक (तालुका भूमि अभिलेख) यांसह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान किसान सन्मान योजना, नैसर्गिक आपत्ती मदत, अन्नसुरक्षा योजना, आणि मोदी आवास योजनेचे लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचावेत अशा सुचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. धान्य साठवणीसाठी नवीन गोडाऊन बांधकाम आणि तालुक्यातील रस्त्यांची अचूक यादी तयार करण्याच्या सूचना • आ.चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. या बैठीकीत शहरातील नाल्यांवर उभारलेल्या टपऱ्या हटवून वाहतूक सुरळीत करावी व अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करावी असे आदेश आ. चंद्रकांत पाटील यांनी दिले. सहाय्यक दुय्यम निंबधक विभागाने नवीन इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी जप्त वाहने काढून जागा मोकळी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शवविच्छेदन कक्ष दुरुस्तीऐवजी नवीन इमारतीसाठी प्रस्ताव सादर करावा अशा सुचना करण्यात आल्या. पोखरा समन्वय समितीच्या बैठकीत आ. चंद्रकांत पाटील यांचे आदेश योजनेजनजागृतीसाठी विशेष शिबिरे आयोजित करावी असे देखील त्यांनी सांगितले. तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांच्या समस्या सोडविणे हे आपले उद्दिष्ट आहे असे देखील त्यांनी सांगितले. या बैठकीत तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी चर्चा करण्यात आली आणि उपाययोजनांवर भर देण्यात आला. या निर्णयांमुळे मुक्ताईनगर तालुक्याच्या विकासाला नवा गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी भाजपा रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदू महाजन, अशोक कांडेलकर प्रवीण चौधरी, आधी उपस्थित होते.

No comments