फैजपूर ला सहकार मेळावा सहकारी संस्था मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील :- ना.रक्षाताई खडसे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत ग...
फैजपूर ला सहकार मेळावा
सहकारी संस्था मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील :- ना.रक्षाताई खडसे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे राष्ट्रीय सहकार भारती स्थापना दिन सप्ताह व सहकार महर्षी जे टी महाजन यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने सहकारी संस्था कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला मेळाव्याचे उद्घाटन ना रक्षा खडसे व आमदार अमोल जावळे यांचे शुभहस्ते झाले यावेळी बोलताना रक्षा ताई म्हणाल्या देशातील सहकारी संस्था मजबूत करून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार सहकार मंत्रालयाचे माध्यमातून मोठे प्रयत्न करत आहे
संस्था कार्यकर्त्यांनी पुढे येऊन संस्थांचे विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत राहावे असे आवाहन केले प्रमुख वक्ते सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगाडे यांनी सहकार भारतीचे स्थापना व उद्देश यावर प्रकाश टाकून राज्य सरकार व सहकारी संस्था यांचा सुसंवाद साधून नवी दिशा देण्याचे काम सहकार भारती करीत असल्याचे नमूद केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केले देश विकसित करण्यासाठी सहकारी संस्था चे मोठे योगदान असल्याचे सांगीतले अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील होते राष्ट्रीय महिला प्रमुख सौ रेवती शेंदूरणीकर आमदार अमोल जावळे शरद महाजन यांनी मनोगत व्यक्त केले व्यसपिठवर भागवत पाटील चंद्रहास गुजराथी सुरेश धनके हिरालाल चौ धरी नारायण चौधरी नितीन चौधरी राकेश फेंगडे मनोजकुमार पाटील चंद्रशेखर चौधरी शशिकांत बेहडे धनराज फिरके प्रवीण कुडे उपस्थित होते जिल्ह्यातील सहकारी संस्था पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते काशिनाथ वारके भूषण नारखेडे शेखर चौधरी राजेंद्र माणेकर राजू मिस्त्री किशोर नेहते अनिल नारखेडे यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन या ए एस बडगुजर व किरण चौधरी यांनी केले


No comments