जलकुंभात लघुशंकेचा संशय; यावल येथे रात्रीच सोडले ३ लाख लिटर पाणी शहराचा काही भाग झाला जलमय, घरांमध्येही शिरले होते पाणी जिल्हा उपसघटक शिंद...
जलकुंभात लघुशंकेचा संशय; यावल येथे रात्रीच सोडले ३ लाख लिटर पाणी
शहराचा काही भाग झाला जलमय, घरांमध्येही शिरले होते पाणी
जिल्हा उपसघटक शिंदे गट नितीन सोनार यांनी जाणून घेतली समस्या
यावल ( प्रतिनीधी )
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जलकुंभाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून ठेवलेल्या इसमाने जलकुंभात लघुशंका केल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला, त्यानुसार नागरिकांच्या तक्रारी वाढल्या शिवाय लोकांच्या संतप्त भावना लक्षात घेत पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने संपूर्ण जलकुंभ रिकामे केले. तीन लाख लिटर पाणी रात्रीच सोडल्याने यावल शहराचा काही भाग जलमय झाला होता, एवढेच नव्हे तर काही
सुरक्षा रक्षकाला कामावरून काढले
जलकुंभ तथा पाण्याच्या सुरक्षेसाठी नगरपालिकेने रोजंदारीवर सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली होती, त्याच्याच वागणुकीबाबत नागरिकांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे नगरपालिकेने त्याला तात्काळ कामावरून कमी केले.
घरांमध्येही पाणी शिरले.
यावल शहरात फैजपूर रस्त्यालगत तडवी कॉलनीत नगरपालिकेचे जलकुंभ आहे. या जलकुंभावर नगरपालिकेने सुरक्षा रक्षक नेमला आहे. या सुरक्षा रक्षकानेच बुधवारी रात्री जलकुंभातील पाण्यात लघवी केली असा संशय नागरिकांकडून व्यक्त
करण्यात आला. रात्रीच पालिकेकडे तक्रार केली, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दादू घोत्रे यांनी रात्रीच जलकुंभ गाठले. त्यांनीही भागातील नागरिकांच्या तक्रारी, संतप्त भावना लक्षात घेत जोखीम न पत्करता अन् संशयाला जागा न ठेवता दादू धोत्रे यांनी रात्रीच संपूर्ण पाणी सोडले.
प्रतिक्रिया - नितीन सोनार जिल्हा उपसंघटक शिंदे गट यावल .
ही होणारी बाब अतिशय गंभीर आहे कारण या पाण्याच्या टाकीत एका नगर पालीका कर्मचारी यांने लघु शंका केली असा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे पाण्याच्या टाकीतले पाणी अचानक सोडण्यात आले . यामुळे काही नागरीकाच्या घरात पाणी शिरले यासाठी तात्काळ मि स्वतह भेट दिली व समस्या जाणून घेतल्या आणि या घटनेच्या कोणही दोषी असो त्याच्यावर कडक कारवाही करण्यात यावी अन्यथा शिंदे गटातर्फे आदोलन छेडण्यात येईल . .

No comments