" मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनकडून जिल्हा बँकेने व्याज माफी योजनेचा लाभ द्यावा.... शेतकरी कृती समिती ची मागणी. चोपडा...
" मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनकडून जिल्हा बँकेने व्याज माफी योजनेचा लाभ द्यावा.... शेतकरी कृती समिती ची मागणी.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
... डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफी मिळणे बाबत परतफेड करताना व्याजाची रक्कम वजा करून वसूल करणेबाबत शासनाचे स्पष्ट आदेश शासन निर्णय ११/०६/२०२१ नुसार दिले आहेत,त्या निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना मा.सहकार आयुक्त यांनी त्यांचे दिनांक १७/०६/२०२१ व दिनांक १४/०३/२०२४चे पत्रान्वये जिल्हा बँकांना कळविल्या आहेत.
परंतु जिल्हा बँकेने दिनांक ०७/१०/२०२४ च्या पत्रानुसार शेतकऱ्यांकडून व्याज सह कर्ज वसूल करणेबाबत संस्था व शाखा यांना कळविले आहे,हेबँकेने थांबवावे .जिल्हा बँकेचे गेल्या वर्षीचे व्याज अनुदान शासनाने अजून दिले नाही ,परंतु त्यात शेतकऱ्यांची काय चूक?आपण साऱ्या संचालक मंडळाने सरकार दरबारी आपले वजन वापरून तेथून अनुदान मिळवून घ्यावे, व शेतकऱ्यांस वेठीस धरू नये.
यावर्षी जास्तीच्या पावसाने हंगाम वाया गेलेला असल्याने आहे व शेतमालास भाव देखील नाही हे आताच सत्तेवर आलेल्या सरकारमधील साऱ्याच पक्षांनी कर्जमाफी करू अशी घोषणा देखील आपल्या घोषणापत्रात नमूद केले होते.परंतु सत्तेत आल्यावर त्याबाबत बोलणे सोडा परंतु किमान मागील योजना तरी बंद करू नये व शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अशी देखील विनंती शेतकरी कृती समितीचे आपल्या निवेदनात केली आहे.
जिल्हा बँकेचे चेअरमन व संचालक यांच्यासाठी चे निवेदन संचालक घनश्याम भाई अग्रवाल यांच्याकडे शेतकरी कृती समितीचे सदस्य एस बी पाटील, डॉ रवींद्र निकम, डॉ सुभाष देसाई,कुलदीप राजपूत,प्रा प्रदीप पाटील, चंद्रकांत पाटील,रमेश पाटील यांनी दिले.

No comments