adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दोघे गावठी कट्टा विक्रीसाठी आले अन्.. अलगद एलसीबीच्या सापळ्यात अडकले

 दोघे गावठी कट्टा विक्रीसाठी आले अन्.. अलगद एलसीबीच्या सापळ्यात अडकले  अहिल्यानगर (:-दि.१६ प्रतिनिधी):- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) पाथर्डी ...

 दोघे गावठी कट्टा विक्रीसाठी आले अन्.. अलगद एलसीबीच्या सापळ्यात अडकले 


अहिल्यानगर (:-दि.१६ प्रतिनिधी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या २आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.नमुद दिलेल्या आदेशाप्रमाणे पोनि.श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सुरेश माळी,संतोष लोढे, रोहित येमुल,सागर ससाणे,प्रशांत राठोड व विशाल तनपुरे यांचे पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.तपास पथक दि.१५ जानेवारी रोजी पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र,हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे ज्ञानेश्वर बाळु बुधवंत,रा.शिरापूर, ता.पाथर्डी हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टा बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने तिसगाव,ता.पाथर्डी येथे मोटार सायकलवर येणार असल्याची माहिती मिळाली. पथकातील पोलीस अंमलदार यांनी पंचासमक्ष शिरापूर ते तिसगाव रोडवर सापळा रचुन संशयीत मोटार सायकलवरील इसमास ताब्यात घेऊन त्यांना नाव विचारले असता त्यांनी ज्ञानेश्वर बाळु बुधवंत,वय २५, रा.शिरापूर,ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर,अशोक बापु महाडीक, वय २५, रा.शिरापूर झोपडपट्टी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून ३०,०००/- रू किंमतीचे एक गावठी पिस्टल, १,५००/-  रू किं.एक जिवंत काडतुस व १,००,०००/-रू किं.पल्सर मोटार सायकल असा एकुण १,३१,५००/- रू.किं.मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

ताब्यातील आरोपी नामे ज्ञानेश्वर बाळु बुधवंत यांचेकडे मिळालेल्या अगिशस्त्रांबाबत विचारपूस केली असता त्याने नमूद अग्नीशस्त्र हे अमोल गर्जे, रा.शिरसाठवाडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर याच्याकडून विक्री करण्यासाठी आणले असल्याची माहिती सांगीतली आहे.वर नमूद आरोपी विरूध्द पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुरनं 54/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments