adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वेळोदे येथे ठेकेदाराने मेन रस्त्याचे काँक्रिटीकरण सोडले अर्ध्यातच. वाहनधारकांमध्ये रोजच किरकोळ कारणावरून होते तू तू मैं मैं.

वेळोदे येथे ठेकेदाराने मेन रस्त्याचे काँक्रिटीकरण सोडले अर्ध्यातच. वाहनधारकांमध्ये रोजच किरकोळ कारणावरून होते तू तू मैं मैं. ( गलंगी ता.चोपड...

वेळोदे येथे ठेकेदाराने मेन रस्त्याचे काँक्रिटीकरण सोडले अर्ध्यातच.

वाहनधारकांमध्ये रोजच किरकोळ कारणावरून होते तू तू मैं मैं.


(गलंगी ता.चोपडा प्रतिनिधी मच्छिंद्र रायसिंग) 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड )

गलंगी तालुका चोपडा येथुन जवळच असलेल्या  वेळोदे येथे माजी. आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून ३००. मी रस्ता टिमिक्स काँक्रिटीकरण अंदाजीत किंमत ९० लाख मंजूर असून १३/९/२०२४ रोजी उद्घाटन होऊन तीन ते चार महिने झाले असून सुद्धा रस्त्याचे काम ठेकेदाराने  अर्ध्यावरती सोडले. काँक्रीटीकरणाचे कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवातही झाली होती. त्यापैकी एका बाजूला रस्ता बनवण्याचे काम सुरू होते मात्र रस्त्यांच्या दोन काँक्रीटीकरणाचे तुकड्यांना जोडण्याचे काम मात्र अपूर्ण आहे. दोन ते अडीच महिन्यापासून ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला असून नागरिक व वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 


बारा ते तेरा खेडेगावांना जाणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे रोजच वाहन धारकांमध्ये किरकोळ वाद उद्भभवतांना दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेलाच चहा नाश्ता साठीची छोटी मोठी दुकाने व लहान लहान विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद मराठी शाळा व तलाठी ऑफिस ग्रामसेवक ऑफिस व  सचिवालय असल्यामुळे रोडवर नेहमीच वर्दळ असुन मातीतून उठणाऱ्या धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असुन नाईलाजास्तव सहन करावा लागत आहे. 

मुख्य रस्ता असल्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला घरांमध्ये धुळीकण प्रमाण जास्तच असल्यामुळे महिलावर्ग व लहान बालकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे तर ठेकेदाराने दोन महिन्यापासून रस्ता खोदून ठेवला असून काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांची व ग्रामस्थांची धूड उडणे ,कट लागणे, साईट न देणे  यावरून लहान लहान विषयावरती तू तू मै मै किरकोळ वाद पाहण्यास मिळतोच.

(प्रतिक्रिया व्यापारी वर्ग )

= धुळीमुळे व्यावसायिक त्रस्त असून मुख्य बाजारपेठ भागातील हा रस्ता असून ठेकेदाराने दोन महिन्यापासून रस्ता खोदून ठेवलेला असल्यामुळे व काम बंद असल्यामुळे धुळीच्या लहान लहान मुलांना व आम्हा व्यवसायिकांना खूपच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे

 व्यावसायिक=भिकन करंदीकर वेळोदे

No comments