फैजपूरात दलित वस्तीमध्ये हायमस्ट लाईट मध्ये घोड? निवेदनाद्वारे चौकशी करण्याची मागणी नगरपालिकेत निवेदन सादर करतांना भिमपुत्र ग्रुपचे कार्य...
फैजपूरात दलित वस्तीमध्ये हायमस्ट लाईट मध्ये घोड?
निवेदनाद्वारे चौकशी करण्याची मागणीनगरपालिकेत निवेदन सादर करतांना
भिमपुत्र ग्रुपचे कार्यकर्ते
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपुर नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री.कुटे साहेब व सौ.संगिता बाक्षे मॅडम यांना निवेदन सादर दलित वस्ती निधी अंतर्गत फैजपुर नगरपरिषदेने शहरातील प्रमुख दलित वस्त्यांमध्ये हायमस्ट लाईट लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून पण त्या मध्ये आम्हाला तफावत आढळून येत असून ते लाईट शहरातील प्रमुख ज्या दलित वस्त्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर संत रोहिदास महाराज नगर श्री.रामदेवजीबाबा महाराज नगर, शिव कॉलनी, तसेच फॉरेस्ट डेपो जवळील काही भाग येथेच लावण्यात यावे, आमच्या असे निदर्शनास आले आहे की काही ठिकाणी दलित वस्ती नसतांना सुद्धा त्या ठिकाणी लाईट लावण्याचे काम फैजपुर न.पा.करत असून ते आम्ही कदापी सहन करणार नाही व तसेच फैजपुर नगरपरिषदेने कोणाच्याही दबावाला बळी न पळता त्या ठिकाणी लाईटची आवश्यकता आहे तिथेच लाईट लावण्यात यावे व तसेच त्या भागात लाईट लावण्यात येणार त्या वस्त्यांमधील लोकांना विश्वासात घेऊनच लाईट लावावे,असे न झाल्यास संबंधित अधिकारी यांच्या वर अनुसूचित जाती /जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद न.पा.प्रशासनाने घ्यावी,तसेच वरील नगरातील लोकांनी सतर्क राहून लाईट आपल्याच वस्ती मध्ये लावले जात आहे का याची खात्री करून घ्यावी असे आव्हान भिमपुत्र ग्रुप तर्फे करण्यात आले आहे,... निवेदन देतांना भिमपुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पप्पु मेढे,रोहित मेढे,मुन्ना मेढे,सागर भालेराव,दिपक हिवरे,शिवा मेढे,राजू वाघ,धीरज मेढे,उदय तायडे,आर्यन केदारे,सुमित मेढे,चेतन गाढे,अतुल मेढे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments