नाभिक समाजातील लोकप्रिय मुख्यमंत्री भारत रत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांची जयंती साजरी शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) नाभिक सम...
नाभिक समाजातील लोकप्रिय मुख्यमंत्री भारत रत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांची जयंती साजरी
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
नाभिक समाजातील लोकप्रिय मुख्यमंत्री भारत रत्न जननायक कर्पुरी ठाकूर यांची जयंती साजरी करण्यात आली सविस्तर वृत्त असे की - नाभिक समाजातील बिहार राज्यातील दुसरे उप मुख्यमंत्री आणि आकरावे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या जीवनाच्या कार्यकाळात स्वतः साठी काहीही न करता आपले संपूर्ण आयुष्य निराधार,गरजू आणि सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी अर्पण केले असे बिहार राज्यातील जनतेचे नायक स्व. जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या १०१वी जयंती निमित्त शिरपूर शहरातील करवंद नाका येथे जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
सदर कार्यक्रमात नाभिक हितवर्धक संस्था,महाराष्ट्र नाभिक महामंडळ,महाराष्ट्र नाभिक कर्मचारी संघटना,जननायक कर्पुरी ठाकूर ओबीसी संघटन, ऑल इंडिया सेन समाज महासंघ,राष्ट्रीय जनसेवा पक्ष,नाभिक दुकानदार संघटना,शिरपूर शहरातील सर्वच ज्येष्ट श्रेष्ठ प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सर्वच उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रविंद्र खोंडे सर यांनी करत जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या जीवन परिचयाची माहिती आलेल्या सर्वच नाभिक समाज बांधवांना करून दिली तसेच नामदेव अहिरे यांनी देखील जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जीवन बद्दल आपले मत व्यक्त केले,आभार जितेंद्र सनेर सर यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांनी केले होते.
.jpg)
.jpg)
No comments