चोपडा येथे सी.सी.आय मार्फत कापुस खरेदी सुरु चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) चोपडा :- सीसीआय आणि कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे...
चोपडा येथे सी.सी.आय मार्फत कापुस खरेदी सुरु
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- सीसीआय आणि कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे शहरातील राधे राधे जिनींग फॅक्टरीमध्ये हमीभावाने कापुस खरेदीस दिनांक ०६/०१/२०२५ वार सोमवार रोजी शुभारंभ प्रसंगी मा. आमदार प्रा.श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचे हस्ते काटा पुजन व कापुस मालाचे पुजन करण्यांत आले असुन मा. आण्णासाहेबानी खरेदी वेळी शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही
याबाबत केंद्र प्रमुख यांना निर्देश दिले सदर शुभारंभ प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक घनश्यामभाऊ अग्रवाल, सी.सी. आय चे केंद्र प्रमुख श्री. योगेश थाळनेरकर बाजार समिती सभापती श्री. नरेंद्र वसंतराव पाटील, उपसभापती श्री. विनायकराव रामदास चव्हाण, संचालक श्री. सुनिल जैन, श्री. अँड. घनश्याम पाटील, श्री. गोपाल पाटील, श्री. अँड. शिवराज पाटील श्री. किरण देवराज श्री. मिलींद पाटील, श्री. वसंत पाटील, श्री. मनोज सनेर (विक्की डाँ) श्री. नंदकिशोर सांगोरे, श्री. सुनिल अग्रवाल जिनींग मालक श्री. अशोक अग्रवाल, श्री. विक्की अग्रवाल, इतर मान्यवर, शेतकरी वर्ग बाजार समितीचे सचिव श्री. रोहिदास सोनवणे, उपसचिव श्री. जितेंद्र देशमुख, नितीन बडगुजर, हे उपस्थित होते
No comments