adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

MSEB च्या सोलर केवल तार चोरी करणारी टोळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात.

MSEB च्या सोलर केबल तार चोरी करणारी टोळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात. जळगाव/अमळनेर प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) दिनांक २२/१२/...

MSEB च्या सोलर केबल तार चोरी करणारी टोळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात.


जळगाव/अमळनेर प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)

दिनांक २२/१२/२०२४ रोजी अंमळनेर तालुक्यातील वावडे गावातील MSEB च्या सोलर प्लान्ट मधील सोलर केबल चोरी झाल्याबाबत मारवाड पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.१७२/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी सदर केबल चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपी अटक करणे बाबत मा.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेश दिले. त्यावरुन मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री गणेश वाघमारे, पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, गोरख बागुल, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, दिपक चौधरी, महेश सोमवंशी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.
वर नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार यांना मिळालेल्या CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरुन वावडे गावातील MSEB च्या सोलर प्लान्ट मधील सोलर केबल चोरी करणा-या आरोपीतांचा त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांची नावे अनुक्रमे १) गोकुळ हिरामण कोरडकर (वय २५ वर्षे) २) भावड्डू जानकु थोरात (वय २४) ३) जिभाउ वामन थोरात( वय२८ वर्षे )रा. सर्व रायपुर ता. साक्री जि.धुळे ०४) गोकुळ राजेंद्र भामरे (वय २४) ०५) राकेश धनराज पाटील (वय २४ वर्षे) रा.दोन्ही कापडणे ता.जि. धुळे असे सांगीतले. त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी MSEB च्या सोलर प्लान्ट मधील सोलर केबल चोरी केल्याबाबत कबुली दिली. तसेच त्यांचेसोबत असलेले इतर ०५ आरोपी फरार असुन पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत. तरी नमुद ०५ आरोपींना अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ०३ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली असुन पुढील तपास मारवाड पो.स्टे. करीत आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, उप विभागीय पोलीस अधिकारी अमंळनेर भाग मा.श्री आण्णासाहेब घोलप मा.श्री.बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे 

No comments