पत्रकारदिनानिमित्त भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पत्रकारांचा सत्कार आश्वी बुद्रुक (प्रतिनिधी) : (संपादक -:-हेमकांत गायकवाड) संगमनेर :- ...
पत्रकारदिनानिमित्त भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पत्रकारांचा सत्कार
आश्वी बुद्रुक (प्रतिनिधी) :
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
संगमनेर :- तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार (दि.६) सकाळी ०९:३५ च्या दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील विविध दैनिकांच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी परिमल पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी व्यासपीठावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी परिमल पवार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी मनीषा नवले मॅडम, आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच बबनराव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सितारामजी चांडे तसेच आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब आदी. उपस्थित होते. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी परिमल पवार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी मनीषा नवले मॅडम तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार सितारामजी चांडे, ज्येष्ठ पत्रकार पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथजी जऱ्हाड, पुण्यनगरीचे पत्रकार संजय गायकवाड, लोकमतचे पत्रकार योगेश राताडिया, संगमनेर लाईव्हचे संपादक अनिल शेळके, सार्वमतचे रवींद्र बालोटे, दैनिक कॉमन न्यूज चीफ ब्युरो सचिन विठ्ठल उपाध्ये, सी न्यूजचे वैभव ताजणे, इंडिया न्यूज 28 चे प्रतिनिधी सुनील घोडेकर, तिरंगा न्यूजचे पत्रकार अझहर शेख , प्रेस फोटो ग्राफर भाऊसाहेब ताजने आदीं. पत्रकारांना शाल, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे कॅलेंडर व डायरी देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार बांधवांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रती ऋण व्यक्त केले.
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी परिमल पवार, स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र चालक सुनील घोडेकर, स्टेट बँक ऑफ इंडिया कर्मचारी राहुल पाबळकर, माधुरी तांबे, वैभव रक्टे, तुषार भडकवाड, मालुंजे ग्रामपंचायत उपसरपंच दत्तूदादा खरात, नामदेव संजय अंत्रे, विवेक जगताप आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र चालक सुनील घोडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी परिमल पवार यांनी आभार मानले.

No comments