adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर

  भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर यावल प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) भालोद येथील ...

 भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर


यावल प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिराची सुरुवात ३ जानेवारी रोजी दत्तक गाव हिंगोणे येथे सुरुवात झाली. या शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सैनिक कै. पंढरीनाथ महारू फालक यांचे सुपुत्र अशोक पंढरी फालक सेक्रेटरी, ज्ञानप्रकाश मंडळ संचलित प्रभात विद्यालय हिंगोणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व से.ए.सो.चे अध्यक्ष चंद्रकांत जगन्नाथ चौधरी, उपाध्यक्ष अनिल सुधाकर चौधरी व्हा. चेअरमन मोहन वसुदेव चौधरी, संचालक, मधुकर लीलाधर परतणे, लीलाधर नारायण चौधरी उपस्थित होते.‌ तसेच हिंगोणे गावच्या सरपंच सौ रुखसाना फिरोज तडवी,  प्रभात विद्यालय हिंगोणेचे मुख्याध्यापक मनोहर जगन्नाथ गाजरे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे व उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी उपस्थित होते.


याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काशिनाथ पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा.डॉ.दिनेश महाजन यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.मोहिनी तायडे यांनी केले. याप्रसंगी रासेयो चे स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.

No comments