मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल मध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर ता...
मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल मध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुक्यातील नावारूपास असलेली शाळा जे.ई. स्कूल मध्ये सांस्कृतिक मंडळांतर्गत आनंदोत्सव आनंदमेळा भविण्यात आला. आनंद मेळ्याचे उद्घाटन संस्थेच्या चेअरमन रोहिणी ताई खडसे यांच्याहस्ते व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे, या अनुषंगाने मुलांनी स्वतः खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावून आपल्याच शालेय मित्रांसह स्टॉल्स वरील खाद्यपदार्थांच्या खरेदी विक्रीचा, व्यापाराचा अनुभव घेतला. उपस्थित मान्यवरांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या स्टॉल्सवर जाऊन त्यांनी बनवून आणलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नंतर आनंद उत्सवाचा भाग म्हणून संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधूभगिनींनी सहभाग घेऊन आनंद लुटला.
यावेळी प्राचार्य एन. पी. भोंबे सर,उपप्राचार्य, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. आनंद मेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी श्रीमती एम. व्ही. चौधरी व एच.जे.तडवी आणि सर्व महिला भगिनींनी पार पाडली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. शेवटी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष एस. आर. ठाकूर सर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा सांगून व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
No comments