नायलॉन मांजा विक्रेते व्यावसायिकांवर सावदा पोलीस व न.पा.ची संयुक्त कारवाई प्रतिनिधी रावेर /सावदा मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड)...
नायलॉन मांजा विक्रेते व्यावसायिकांवर सावदा पोलीस व न.पा.ची संयुक्त कारवाई
प्रतिनिधी रावेर /सावदा मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
पतंग उडविण्यासाठी उपयोगात येत असलेल्या तथा वापरले जाणार्या नायलॉन मांजा धाग्यामुळे वाढणाऱ्या दुर्घटनांचे वाढते प्रमाण
लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार पतंगाचा माजा विक्री करणाऱ्या दुकानदार अथवा व्यावसायिका विरुद्ध सावदा नगरपालिका सह सावदा पोलिस ठाण्याने धडक कारवाई ची मोहीम सुरू केली आहे. सावदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा आणि सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन मांजा जप्तीची धडक कारवाई केली. या कारवाईत मांजा विक्रेत्यांची तपासणी
करण्यात आली. प्रशासनातर्फे विक्रेते व नागरिकांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. या पथकात पालिकेचे लेखापाल विशाल पाटील, पोलिस कर्मचारी मयूर पाटील, सतीश पाटील, अविनाश पाटील, हमीद तडवी, कार्तिक ढाके, अरुणा चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोणत्याही विक्रेत्याने मांजा विक्री करू नये, असे करताना आढळल्यास कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी वर्मा आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी केले आहे.

No comments