"विद्यार्थ्यांनी वाचन कौशल्य विकसित करावे"-:- डी.एस .चव्हाण मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मुक्त...
"विद्यार्थ्यांनी वाचन कौशल्य विकसित करावे"-:- डी.एस .चव्हाण
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी . जी.खडसे महाविद्यालयात "वाचन कौशल्य " या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली . सदर कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. डी. एस .चव्हाण सर मुक्ताईनगर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. सी .एस .चौधरी उपस्थित होते. या समारंभाला प्राचार्य डॉ. एच. ए .महाजन यांनी मार्गदर्शन केले.
प्राध्यापक डी एस चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना "वाचनाचे महत्त्व "यावर मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. वाचनातून ज्ञानवृद्धींगत होते,ज्ञानामुळे ज्ञानी माणसाचा सर्वत्र मानसन्मान होतो. तसेच वाचनाने आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ होत जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे .यशस्वी जीवनासाठी पुस्तक वाचन ही काळाची गरज आहे वाचनाचा छंद जोपासल्याने वर्तमानपत्रे ,मासिके ग्रंथालयातील पुस्तके , चरित्रे महापुरुषांची आत्मचरित्रे, प्रवास वर्णन, कथा, कादंबऱ्या , हे साहित्य आपल्या आयुष्याला योग्य वळण देण्याचं काम करतात.
तसेच अध्यक्षीय भाषणात डॉ. सी .एस .चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आजचा विद्यार्थी सोशल मीडियामध्ये गुंतून पडला आहे .विद्यार्थ्यांनी खरे ज्ञान आत्मसात करायचे असेल, तर त्यांनी वेगवेगळ्या साहित्यिकांचे साहित्याचे वाचन करून आपल्या विचारांची धारा बनवावी. पुस्तके वाचनातून प्रेरणा मिळते ,महापुरुषांची चरित्रे आत्मचरित्र वाचून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. असे आपले विचार त्यांनी मांडले.
प्राचार्य डॉ. एच .ए .महाजन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की वाचनाने मनुष्य समृद्ध होत असतो त्यासाठी बौद्धिक कष्ट ,मेहनत चिकाटी, स्वतःजवळ असायला हवी. आणि विद्यार्थी जीवनात जीवनाला दिशा देणारे साहित्याचे वाचन करावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सुचित केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. छाया खर्चे यांनी केले तसेच, डॉ.डी. एन
बावस्कर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .तसेच या कार्यक्रमाला डॉ.डी .आर. कोळी प्रा. सरोदे प्रा. डॉ. शेख सर व बहुसंख्या विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

No comments