adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धावत्या पुष्पक एक्सप्रेस मधुन जिव वाचविण्यासाठी मारल्या उड्या पण समोर येणारी कर्नाटका एक्सप्रेस ने चिरडले

धावत्या पुष्पक एक्सप्रेस मधुन जिव वाचविण्यासाठी मारल्या उड्या पण समोर येणारी कर्नाटका एक्सप्रेस ने चिरडले जळगाव प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत...

धावत्या पुष्पक एक्सप्रेस मधुन जिव वाचविण्यासाठी मारल्या उड्या पण समोर येणारी कर्नाटका एक्सप्रेस ने चिरडले


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 पाचोरा नजीक असलेल्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ आज २२ जानेवारीला सायंकाळीच्या सुमारास भीषण रेल्वे दुर्घटना घडली.असून या दुर्घटनेत पुष्पक एक्सप्रेसमधील  प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. त्यातचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनं  पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, काही जणांचा मृत्यू झाल्याचे हि वृत्त समोर आले आहे. जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जळगावच्या परधाडे गावाजवळ हा अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊकडून मुंबईकडे येत होती.


एक्स्प्रेसच्या लोकोपायलटनं अचानक ब्रेक दाबले. त्यामुळं ठिणग्या उडाल्या. आग लागल्याच्या भीतीनं पुष्पक एक्स्प्रेसमधून ३५ ते ४० प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी बाजूच्या रुळांवरून बेंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस जात होती. त्या कर्नाटक एक्स्प्रेसने यातील काही प्रवाशांना उडवलं.या दुर्घटनेत आठ ते नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाहीये. दरम्यान, अपघातातील जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान काही तासानंतर पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे तर कर्नाटक एक्स्प्रेस नवी दिल्लीकडे रवाना करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व रेल्वेच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

No comments