जळगांव जिल्ह्यातील व रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील रहिवाशी चि तुषार रामचंद्र कोळी सोशल मीडियावर जिंकतोय लाखो प्रेक्षकांची मने. रावेर/ चो...
जळगांव जिल्ह्यातील व रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील रहिवाशी चि तुषार रामचंद्र कोळी सोशल मीडियावर जिंकतोय लाखो प्रेक्षकांची मने.
रावेर/ चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
सध्या सोशल मीडियावर जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील तुषार कोळी अभिनयाने दैनंदिन जीवनातील प्रसंगाच्या सादरीकरणाने या कलावंताने खान्देश व मध्ये प्रदेश कौतुकाची थाप मिळवली आहे.
गावच्या पुनखेडा ता.रावेर बोलबाला वाढला असून त्याच्या फॉलोवरची संख्या अकराहजारावर पोहोचली आहे. आपल्या बोलीभाषेतील सोशल मीडियावरील कलागुणांच्या माध्यमातून हा कलावंत लाखो युवकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. तुषार हा गेल्या काही वर्षापासून आपल्या अभिनयाने लोकप्रिय झाला आहे. आपल्या गावठी मराठी भाषेत हा तरुण आपली दिनचर्या इंस्टाग्राम माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.तुषार कोळी इंस्टाग्रामवर ११ हजार फॉलोवर्स असून या कलाकारांचे जिल्हा भर कौतुकाची थाप पडत आहे.

No comments