११ जानेवारी च्या मूक मोर्चामध्ये मातंग समाजाने मोठ्या संख्येने सामील व्हावे... .. जगदीश मानवतकर वाशीम प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवा...
११ जानेवारी च्या मूक मोर्चामध्ये मातंग समाजाने मोठ्या संख्येने सामील व्हावे..... जगदीश मानवतकर
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दि. ११ जानेवारी २०२५ रोजी वाशीम येथे स्व.संतोष देशमुख आणि स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि मारेकऱ्यांना फाशी व्हावी , त्यांच्या घरच्यांना न्याय मिळावा आणि या हत्ते मागे कोणाचा हात आहे . ? याचा शोध लावून त्याला तात्काळ कडक शिक्षा द्यावी . या व इतरही मागणीकरिता दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी मूक मोर्चाचे आयोजन वाशीमनगरीत करण्यात आले आहे .
हा मूक मोर्चा वाशिम मधील सर्व जातीतील आणि धर्मातील समाजातर्फे आयोजित करण्यात आला आहे. तरी वाशिम मधील सर्व मातंग समाजासह सर्व जातीतील, धर्मातील बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बहुजन भारत पार्टीचे राज्य सचिव जगदीश मानवतकर यांनी केले आहे. हा मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशिम येथून सुरू होणार आहे आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे समाप्त होणार आहे. तरी अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्र मध्ये कोणावरही पुन्हा घडू नये आणि महाराष्ट्राचे बिहार होऊ नये, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी ,लोकशाही वाचवावी आणि संविधानाचे रक्षण व्हावे याकरिता सर्व वाशिम करांनी या मूक मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आव्हान जगदीश मानवतकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ,समर्थकांना आणि वाशिम करांना केले आहे. त्याचबरोबर जगदीश मानवतकर यांनी आपल्या संघटनेचा आणि पक्षाचा जाहीर पाठिंबा या मोर्चाला दिला आहे. तरी यावेळी बहुसंख्येने सर्व वाशिम सरांनी उपस्थित रहावे असे आवाहन जगदीश मानवतकर यांनी केले आहे.


No comments