adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निकृष्ट कामाचा रस्ता ठरतोय उत्कृष्ट नमुना, नागरिकांमधून नाराजी

गणपुर ते मराठे डांबरीकरण रस्ता बनतोय फक्त नावालाच. निकृष्ट कामाचा रस्ता ठरतोय उत्कृष्ट नमुना, नागरिकांमधून नाराजी ग लंगी तालुका चोपडा मच्छिं...

गणपुर ते मराठे डांबरीकरण रस्ता बनतोय फक्त नावालाच.

निकृष्ट कामाचा रस्ता ठरतोय उत्कृष्ट नमुना, नागरिकांमधून नाराजी


लंगी तालुका चोपडा मच्छिंद्र रायसिंग 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

गलंगी तालुका चोपडा. तालुक्यातील गणपुर ते मराठे चार किलोमीटर दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत असून हे काम सध्या निकृष्ट कामाच्या उत्कृष्ट दर्जा सुरू आहे अवघ्या रस्ता तयार होत असून ठीक ठिकाणी रस्ताचे मधोमध खड्डे खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून गणपुर मराठे नागरिकांचा नाराजीचा सूर निघताना दिसून येत आहे.हे काम लाखो रुपयांच्या असून चार किलोमीटर मजबुती करणे व डांबरीकरण करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून रस्त्याचे काम आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून बऱ्याच वर्षानंतर या भागातील नागरिकांचे मागणी पूर्ण झाली होती.पण निकृष्ट कामामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्याचे मजबुतीकरण करत असताना.योग्य प्रकारे दबाई व गिट्टीच्या वापर न करणे कागदाचे कार्टून सारखे थर लावणे यासह निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून पुढे काम चालू पण मागे ठीक ठिकाणी रस्ता उखळणे चालू.यावरून गणपुर व मराठे येथील नागरिकांना समजून येत आहे.की किती निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे.एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करीत असताना संबंधित ठेकेदार अधिकारी सोयीस्करपणे कामाकडे दुर्लक्ष करण्याचे काम करीत आहेत. 


निकृष्ट कामाबद्दल काही ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चोपडा यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नही केला असता कोणताही प्रतिसाद दिला नाही.मग सामान्य जनता यांनी तक्रार करावी कुठे? हा मोठा प्रश्न उदभवतांना दिसून येत आहे.काही जड वजनामुळे तर फोन उचलला जात तर नाही ना? असेही नागरिकांनी आपल्या भावना आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले. 

सार्वजनिक बांधकाम उपविभाग चोपडा विभागाने फक्त गणपुर ते मराठे रस्त्यावर एक वेळ तरी पाहणी करावी अशी अपेक्षा मराठे तालुका चोपडा येथील ग्रामस्थ व सुज्ञ नागरिकांनी केली आहे

No comments