आळंदी देवाची येथे उज्जैनकर फाउंडेशनचे विश्वविक्रमी ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन उत्साहात इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) ...
आळंदी देवाची येथे उज्जैनकर फाउंडेशनचे विश्वविक्रमी ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन उत्साहात
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या ७४५ व्या सप्तशतकोत्तर जन्म महोत्सवी वर्षानिमित्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर चे ऐतिहासिक राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी देवाची येथे उत्साहात संपन्न झाले.या संमेलनाचे उद्घाटक मुलाखतीकारांचे बादशहा सुधीर गाडगीळ, संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. सुमती पवार ,संमेलनाचे अतिथी बार्टी भारत सरकारचे महासंचालक सुनील वारे ,संमेलनाचे कार्याध्यक्ष आळंदी येथील सुरेश वडगावकर, संयोजक प्रकाश काळे, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, निमंत्रक सौ. रूपाली चिंचोलीकर ,सहसंयोजक अजितभाऊ वडगावकर, सहकार्य अध्यक्ष रामचंद्र कुऱ्हाडे पाटील, सह निमंत्रक डॉ.ज्ञानेश्वर ( दिपक ) पाटील, मुख्य आयोजक / शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर, कार्यकारणी खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर, फाउंडेशनच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहभागाने यशस्वी झाले.या संमेलनात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई कडून ७४५ फुटाची व १०१ किलो वजनाची जाड राखी अर्पण करण्यात आली.एम आय टी च्या प्रमुख स्वातीताई कराड चाटे यांची विशेष उपस्थिती होती. या विश्वविक्रमी राखीचे जनक स्वागताध्यक्ष डॉ. सुरेंद्र हेरकळ व एमआयटी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर श्री ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा या ग्रंथदिंडीत ढोल पथकासह विशेष सहभाग होता.उद्घाटन सत्रात फाउंडेशनचे तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार ३१ पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले तर.याप्रसंगी संमेलनाच्या विशेषांकाचे व पदाधिकाऱ्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाश काळे यांच्या अध्यक्षतेखाली ओळख श्री. ज्ञानेश्वरी हा परिसंवाद व ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली ठेंग यांचे अध्यक्षतेखाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा या दुसऱ्या परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यानंतर फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी पुणे व आळंदी येथील स्थानिक कलाकार व पदाधिकारी यांच्या सहभागाने बोलीभाषेतील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यानंतर श्री तुळशीराम बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली व सुप्रसिद्ध वक्ता,साहित्यिक डॉ. शिवानंद भानुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यानंतर फाउंडेशनचे राज्य सल्लागार ठाणे येथील सुप्रसिद्ध कवी सतीश सोळाकुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व सुप्रसिद्ध कवी गणेश आघाव व अजित वडगावकर ,फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष डॉ.सुभाष बागल, राज्य उपाध्यक्ष विनोदभाऊ
डीडवानिया,राज्य उपाध्यक्ष पुणे येथील डॉ. अजयकुमार लोळगे, कनिष्ठ महाविद्यालय भाषा महामंडळाचे अध्यक्ष प्रा. सुनील डीसले, फाउंडेशनचे राज्य सचिव एडवोकेट सर्जेराव साळवे,राज्य प्रसिद्ध प्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत ,ह. भ. प. वृषाली गायकवाड, राज्य समन्वयक डॉ. राजकुमार कांकरिया, राज्य संघटक पुणे येथील डॉ.निशिकांत धुमाळ, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सुनील धनगर तसेच आळंदी येथील वारकरी, गावकरी, पत्रकार, साहित्यिक, रसिक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनाला श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, एमआयटी श्री ज्ञानेश्वर बी. एड.कॉलेज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी साहित्यिक, रसिक मोठया संख्येने उपस्थित होते. या संमेलनाचे ग्रिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व लीमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आले . याप्रसंगी सुनील मुंधोकार , बाळूभाऊ ईटणारे , सचिन उज्जैनकर, अरविंद उज्जैनकर , तुषार भोळे, अंकित नायसे, राहुल वराडे, ललित कुमार फिरके,सागर इटणारे आणि फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments