महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट तिसऱ्या अपत्यामुळे सेवेतून बडतर्फ पुणे प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) लहान कुटुंबाचे प्रति...
महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट तिसऱ्या अपत्यामुळे सेवेतून बडतर्फ
पुणे प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ करीत असल्याने विभागीय चौकशीत तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सदरील कारवाई केली असुन दांगट हे महापालिकेत लिपिक असुन सेवेत रुजू झाले होते. महापालिका आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी अभिनामाची सरळसेवेची रिक्त पदे भरतीसाठी २९ जुलै २०१३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीच्या अटी व शर्तीचे अधीन राहून दांगट यांना महापालिका आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी या गट 'ब' या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. प्रशासन अधिकारी होताना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक होते. त्याबाबत त्यांना वेळोवेळी कळवूनही प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. दांगट यांच्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीत दांगट यांनी तीन अपत्ये असल्याचे मान्य केले. शासनाच्या १ जुलै २००५ च्या लहान कुटुंबाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले. त्यानुसार दांगट यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. फेब्रुवारी अखेर सेवानिवृत्त होणार होते.. सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांचा सेवा कालावधी २८ फेब्रुवारी २०२५ ला संपणार होता. पावणे दोन महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. निवृतीला दीड महिन्यांच्या कालावधी शिल्लक असतानाच त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने माझी बाजू जाणून घेतली नाही. बडतर्फ करण्याची कारवाई अन्यायकारक आहे. याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे श्रीनिवास दांगट यांनी सांगितले.

No comments