माझा बोलण्याचा वरील आरोपीना राग आल्याने मला लाथा बुक्यांनी मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल चोपडा (प्रतिनिधी)-- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) ...
माझा बोलण्याचा वरील आरोपीना राग आल्याने मला लाथा बुक्यांनी मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल
चोपडा (प्रतिनिधी)--
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
पिडीत मुलीच्या नोटबुकवर काही तरी लिहलेले होते म्हणून तिचे आई वडीलांना सांगावे लागेल असे सांगितल्याचा मला लाथा बुक्यांनी मारहाण केली म्हणून फिर्यादी भूषण रविंद्र मनोरे यांच्या
फिर्यादी वरून शहर पोलिस स्टेशनला सहा जणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी भूषण रविंद्र मनोरे हे बालमोहन विद्यालयात शिक्षक आहेत माझी विद्यार्थ्यांनी आहे मी तिला कश्याला त्रास देवू तिने तिच्या नोटबुकवर काही तरी लिहलेले होते महणून तिचे आई वडीलांना सांगावे लागेल असे बोललो होतो. माझा बोलण्याचा आरोपीना राग आल्याने त्यांनी मला शिवागाळ करुन माझे गालावर डाव्या डोळ्यावर, पोटावर छातीवर लाथा बुक्यांनी तसेच PVC पाईपने
मारहाण करुन दुखापत केली व हातपाय तोडून टाकेन अशी धमकी दिली म्हणून गुन्हा सहा जणा विरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
No comments