Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका शिक्षकावर पोक्सो कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल...!

  चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका शिक्षकावर पोक्सो कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल...!   चोपडा (प्रतिनिधी) --  (संपादक-:- हेमकांत गायकवाड) श...

 चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका शिक्षकावर पोक्सो कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल...!  

चोपडा (प्रतिनिधी) -- 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका शिक्षकावर पोक्सो कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल...!  शिक्षक आरोपी भुषण रविंद्र मनोरे याने पिडीत मुलगी हिस शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देवून जवळकी करण्याचा प्रयत्न करुन त्रास दिल्यावरून चोपडा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आले.

   पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील बालमोहन महाविद्यालयातील शिक्षक भुषण रविंद्र मनोरे याने महाविद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थीनीला यातील आरोपीताने पिडीत मुलगी हिस शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देवून जवळकी करण्याचा प्रयत्न करुन त्रास दिला तसेच पिडीत मुलगी एकटी घरी असतांना घरी येथून तिचा हात धरुन तिस शारीरीक जवळीक करण्याचा प्रयत्न केला तसेच तिने त्यास विरोध केला असता आरोपीने तिला हाताने मारहाण करुन घरातील कैच्चीचा धाक दाखविला म्हणून चोपडा शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं. भादंवि कलम भाग-५ भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ३३३,७४,७५,११५(२),३५१(२) पोक्सो कायदा कलम ८,१२, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी हा प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे अधिक तपास करीत आहे.

No comments