वेळुंजे शिवारामध्ये अवैध दगड उत्खनन महसूल विभागाचे दुर्लक्ष ? त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) त्र्यंबकेश्वर तालुक्याती...
वेळुंजे शिवारामध्ये अवैध दगड उत्खनन महसूल विभागाचे दुर्लक्ष ?
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे ग्रामपंचायत शिवारामध्ये दगड उत्खनन करण्याचा जिल्हा खनिकर्म विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा रॉयल्टी भरलेली नसतानाही अवैध ब्लास्टिंग लावून उत्खनन चालू होते गौण खनिज उत्खनन किंवा खनिपत मिळवण्यासाठी शेतजमीन अनिकृष परवाना,ग्रामपंचायतचा ठराव,ग्रामसभेचा ना हरकत प्रमाणपत्र,पर्यावरण विभागाची परवानगी यासह जवळपास २९ अटींची पूर्तता करावी लागते यामधील ठेकेदाराने एकही अटीची पूर्तता न करता अवैध दगड उत्खनन सुरू करण्यात आले होते. यासंदर्भात गावातील नागरिकांनी विचारणा केली तर तो ठेकेदार रात्रीतुन मशिनरी घेऊन पळून गेला सदर या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी पर्यावरण प्रेमी तसेच गावातील नागरिकांची मागणी होत आहे.
प्रतिक्रिया,
जिल्हा खनिकर्म विभागाकडून, किंवा ग्रामपंचायत ठराव ग्रामसभेचा ना हरकत प्रमाणपत्र पर्यावरण विभागाची परवानगी कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा रॉयल्टी भरलेली नसतानाही ब्लास्टिंग लावून अवैध दगड उत्खनन चालू होते. आम्ही विचारणा केली तर तो रात्रीच्या वेळेस मशनरी घेऊन पळून गेला. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
जयवंतभाऊ हागोटे
भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नाशिक जिल्हा चिटणीस |

No comments