adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हिंदी मराठी पत्रकार संघा कडून पत्रकार शांताराम झाल्टे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित.

 हिंदी मराठी पत्रकार संघा कडून पत्रकार शांताराम झाल्टे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जामनेर प्रतिनि...

 हिंदी मराठी पत्रकार संघा कडून पत्रकार शांताराम झाल्टे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जामनेर प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

(जामनेर,दि११) मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे निमित्ताने पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जामनेर येथील पत्रकार~शांताराम झाल्टे यांना संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शासन आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून लोकशाहीचा ४ था.आधारस्तंभ म्हणजेच पत्रकारितेचा नामोल्लेख केला जातो.समाजातील सत्य शोधुन निपक्ष व निर्भिडपणे जनते समोर मांडण्याचा वसा घेऊन पत्रकारीतेच्या माध्यमातून ठसा उमटविणार्‍या तसेच शासकीय योजनांच्या प्रगतीची राज्याच्या विकासाची इत्यंभूत माहिती सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचविण्या साठी विविध विकास योजना त्यांची अंमलबजावणी या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील लोकांचा सहभाग जनते पर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसार माध्यमांची भुमिका महत्त्वाची आहे.हि जबाबदारी पार पाडताना पत्रकारांची धडपड ही खरोखर उल्लेखनीय बाब असून समाजा पुढे सत्य काय ते मांडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे तितकेच महत्त्वाचे आहे.विकास विषयक उत्कृष्ट बातम्या वार्तापत्रे,लेखन करणार्‍या पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार देणे म्हणजे त्यांचा योग्य सन्मान व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय तसेच लक्षणीय योगदान देणाऱ्या पत्रकारांना त्याच प्रमाणे समाज माध्यम आणि स्वच्छता अभियाना बाबत केलेल्या जन जागृतीपर लेखनासाठी पुरस्काराने गौरविण्यात येणे म्हणजे त्यांचा योग्य सन्मान करणे.६ जानेवारी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ साली "दर्पण" हे वृत्तपत्र सुरू केले त्याच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील लेवा नवयुवक मंडळाच्या प्रशस्त सभागृहात राज्यस्तरीय आदर्श पत्रकार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.जामनेर येथील निर्भिड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष~ सुनिल इंगळे,अनिल शिरसाठ,सागर लव्हाळे, मोहन दुबे,मनोज दुसाने,अक्षय वानखेडे, शांताराम झाल्टे,सुनिल शेजूळे,मोहन जोशी, नितीन इंगळे, देविदास विसपुते,अरुण तायडे, साहेबराव क्षिरसागर,किरण चौधरी,यांच्या सह मलकापूर,नांदुरा,खामगाव,बुलढाणा, मोतळा,जळगांव,मुक्ताई नगर,बोदवड, भुसावळ येथील पत्रकार बांधवांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहुन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला.कार्यक्रमास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी,तहसिलदार, पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक,तसेच उद्योगपती यांच्या हस्ते प्रतिष्ठीत नागरीक,वीर पत्नी,ज्येष्ठ संपादक,जेष्ठ पत्रकार,समाज सेवक,यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी जामनेर येथील निर्भिड पत्रकार संघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष पत्रकार~ सुनिल इंगळे यांचा पत्रकारिता क्षेत्रातील अमूल्य योगदान,उत्कृष्ट सामाजिक कामगिरी बद्दल"राज्यस्तरीय आदर्श पत्रकार" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार~सुनिल इंगळे यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल "राज्यस्तरीय आदर्श पत्रकार" पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर संपूर्ण जिल्हा भरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

No comments