adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

६जानेवारी पत्रकार दिनानिमित्त जामनेरात तहसिलदारांकडून पत्रकारांचा सन्मान...।

  ६जानेवारी पत्रकार दिनानिमित्त जामनेरात तहसिलदारांकडून पत्रकारांचा सन्मान...। ~~~~~~~~~~~~ पत्रकार हा शासन आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुव...

 ६जानेवारी पत्रकार दिनानिमित्त जामनेरात तहसिलदारांकडून पत्रकारांचा सन्मान...।

~~~~~~~~~~~~

पत्रकार हा शासन आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा..तहसिलदार नाना साहेब आगळे.



~~~~~~~~~~~~

(जामनेर,दि.११):~पत्रकार दिन निमित्त जामनेर येथे तहसिल कार्यालय येथे महसूल विभागाच्या वतीने छोटेखानी पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी तहसिलदार नाना साहेब आगळे यांनी पत्रकार शांताराम झाल्टे यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित केले। यानंतर उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.

 ६ जानेवारी हा दिन पत्रकार दिन म्हणून संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जातो. ६ जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्राचे जनक,आद्य पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांनी "दर्पण" हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र सुरू केले.त्याचे स्मरण म्हणून ६ जानेवारी हा दिवस "दर्पण" दिन किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी "दर्पण" वृत्तपत्रातून जनजागृती केली. जातिव्यवस्था, जातिभेद, स्त्री गुलामगिरी,सती प्रथा, अस्पृश्यता,बालविवाह याविषयी त्यांनी "दर्पण" च्या माध्यमातून लेखन केल्या मुळे त्यांना आद्य समाज सुधारक ही म्हटले जाते. मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत आपला वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे. याची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ साली केली.समाज प्रबोधना साठी त्यांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले.आता या पत्रकारिता विश्वाचे एका वटवृक्षात रुपांतर झाले असल्याचे मनोगत जामनेर चे कर्तव्यदक्ष तहसिलदार~ नाना साहेब आगळे यांनी व्यक्त केले.६ जानेवारी हा दिवस संपूर्ण राज्यात पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून विविध संघटनांच्या वतीने विविध उपक्रमां सह पुरस्कार वितरण, रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिरे,यासह अन्य अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.याच पत्रकार दिनाचे औचित्य साधून जामनेर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा महसूल विभागाच्या वतीने छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी तहसिलदार नाना साहेब आगळे यांनी पत्रकार शांताराम झाल्टे यांचा पत्रकारी क्षेत्रात उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मान केला.या सन्मान सोहळ्याला पत्रकार~सुनिल इंगळे,अनिल शिरसाठ,सागर लव्हाळे, मोहन दुबे,मनोज दुसाने,अक्षय वानखेडे,किरण चौधरी, मोहन जोशी,सुपडू जाधव,विलास ढाकरे, मिलिंद लोखंडे,इम्रान खान,नाजिम शेख, नितीन इंगळे,साहेबराव क्षिरसागर,अरुण तायडे, देविदास विसपुते,बाळू वाघ यांचा देखील यावेळी तहसिलदार~नाना साहेब आगळे तसेच नायब तहसिलदार प्रशांत निंबोळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

No comments