फैजपूरात आज सहकार भारती संस्था कार्यकर्ता मेळावा प्रमुख मान्यवरांची उपस्थिती इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) सहकार भारती अख...
फैजपूरात आज सहकार भारती संस्था कार्यकर्ता मेळावा
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
सहकार भारती अखिल भारतीय संस्था असून २६ राज्यांमध्ये सहकार भारतीचा विस्तार आहे. निस्वार्थ, सुसंस्कारित अभ्यासू सहकारी तयार व्हावे. संस्थांमध्ये परस्पर समन्वय व्हावा व सुसंगठीत सहकार शक्ती उदयास यावी यासाठी
पदाधिकारी व कार्यकर्ता, कर्मचारी वर्ग यांचेशी सुसंवाद साधण्यासाठी व सहकार क्षेत्रातील वाटचाल बाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी
सहकार भारती जळगाव जिल्हा स्थापना दिन सप्ताह व सहकार महर्षी दादासाहेब कै जे टी महाजन यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त सहकारी संस्था कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी १० वा शहरातील शुभ दिव्य मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन सहकार भारती जळगाव जिल्हा यांनी केले असून या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, रावेर विधानसभेचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मंत्री सहकार भारती दिलीप रामू पाटील राहतील. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रदेश महामंत्री सहकार भारती विवेक जी जुगादे व प्रमुख अतिथी राष्ट्रीय महिला प्रमुख सहकार भारती रेवती ताई शेंदुर्णीकर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमासाठी उपस्थिती द्यावी असे आव्हान जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
या मान्यवरांची उपस्थिती राहील.
शरद महाजन, भागवत पाटील, सतीश मदाने,उल्हास चौधरी, विनोद पाटील,चंद्रहास गुजराथी,हिरालाल चौधरी, सुरेश धनके, राकेश फेगडे, हेमंत चौधरी,हर्षल पाटील, चंद्रकांत चौधरी, नारायण चौधरी, नितीन चौधरी, विलास बोरोले, मनोज पाटील, चंद्रशेखर चौधरी,पांडुरंग सराफ, नितीन व्यंकट चौधरी,गणेश नेहते, प्रशांत चौधरी, मुन्ना चौधरी, उमेश फेगडे, तेजस पाटील या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
No comments