adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन येथे डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची दांडी... ? पशुपालकांची गैरसोय होत असून चौकशीची मागणी

  पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन येथे डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची दांडी... ? पशुपालकांची गैरसोय होत असून चौकशीची मागणी चोपडा तालुका प्रतिनिधी...

 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन येथे डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची दांडी... ?

पशुपालकांची गैरसोय होत असून चौकशीची मागणी


चोपडा तालुका प्रतिनिधी खलील तडवी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन ता.धानोरा येथे डॉ.मुख्यालय राहत नसून कायमस्वरूपी उपस्थिती राहत नाही व शिपाई कायमस्वरूपी राहत नाही असे परिसरातील पशुपालक शेतकरी व लोकांकडून बोलले जात आहे असे समजते त्यामुळे पशुपालक पशुधनावर खाजगी डॉ.वैद्यकांकडून उपचार करुन घेत आहे.गुरांचा हा दवाखाना श्रेणी दोन आहे.या दवाखान्यास शिपाई पद मंजूर आहे.त्यात पशुवैद्यकीय डॉ गावात कायम स्वरूपी राहत नाही त्यामुळे धानोरा परिसरातील पशुपालक यांची गैरसोय नाराजीचा सूर येताना दिसून येत आहे.धानोरा दवाखान्यात रोज पशुवैद्यक वेळोवेळी येत नसल्याने व मुख्यालय राहत नाही असे वरिष्ठांच्या निदर्शनास येणे गरजेचे दिसून येत आहे.


चोपडा तालुक्यातील मोठ्या गावान पैकी २१ हजार लोक वस्ती पेक्षा जास्त वस्ती असलेले धानोरा हे गाव मोठे असल्याने या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात असून पशुधनाची संख्या अधिक असल्याने ही समस्या सुटणे आवश्यक आहे.पशुवैद्यकीय डॉक्टर नियमित वेळेवर येत नसून दवाखाना हा दुसऱ्याचा भरवशावरच जबाबदारपणे सुरू आहे.परिसरातील अन्य गावेही याच दवाखान्याला जोडले आहे.पशुपालक हा दवाखान्यात आल्यावर बऱ्याचवेळा १२ वाजे नंतर दवाखाना हा बंदच आढळतो.गावात गुरांची संख्या मोठी आहे.रोगराईत या गुरांवर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे.त्यासाठी येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकाची गरज आहे.याकरिता कायमस्वरूपी शिपाई व पशुवैद्यकीय डॉक्टर मुख्यालय कायमस्वरूपी राहणे बाबत शासन परिपत्रक असूनही याचे अवमान होताना दिसून येत आहे तरी संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून लोकांची होणारी गैरसोय बाबत दखल घ्यावी असे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया

(डॉ.दीपक पाटील

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन.धानोरा 

येथील श्रेणी दोन शिपाई पदाच्या जागा रिक्त नाही शिपाई मयत झाल्याने अनुकंपावर भरण्यात येणार आहे नाहीतर कॉन्ट्रॅक्ट बेस वर शिपाई पदाची भरती करणार आहेत.मी बारा वाजे नंतर दवाखाना बंद परिसरातील अन्य गावे ही या दवाखान्याला जोडले आहे.म्हणून दुपारनंतर मला खेड्यापाड्यांवर गुरांच्या स्टेटमेंट साठी जावे लागतं )


No comments