आमदार हिरामण खोसकर यांचा हरसुल गणात आभार दौरा त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी जयराम बदादे (संपादक -:-हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र राज्यातील ...
आमदार हिरामण खोसकर यांचा हरसुल गणात आभार दौरा
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी जयराम बदादे
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूका पार पडल्या आणी महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले, अशातच त्र्यंबकेश्वर/व इगतपुरी मतदार संघाकडे सर्वाचेच लक्ष लागुन होते, यावेळी दुसऱ्यांदा हिरामण खोसकर यांच्या गळ्यात आमदारकीची माळ जनतेनी घातली, आणि राज्याच्या विधानसभेत त्यांना पाठवलं, जनतेने मतदान रुपी भरभरून दिलेला आशीर्वादाचे आभार मानण्यासाठी खोसकर यांनी हरसुल गणात आभार दौरा केला, या दौऱ्यात नागरिकांना शासकीय योजणांची माहिती दिली, यावेळी जेष्ठ नेते संपत सकाळे, राष्ट्रवादी तालुका प्रमुख बहिरु मुळाने, झालं.मा.जि.प. सदस्य विनायक माळेकर, युवा नेते शारीख शेख, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस स्वप्नील शार्दूल,मा. उपसरपंच राहुल शार्दूल,शहर प्रमुख अशोक लांघे, सरपंच विष्णू बेंडकोळी,मा.जि.प.सदस्य भावराज राथड,मुज्जफा शेख,अक्षय मोरे आदि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments