adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राहाता तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत रांजणखोल शाळेचे घवघवीत यश बळीराम माळी ठरला तालुक्यात अव्वल

  राहाता तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत रांजणखोल शाळेचे घवघवीत यश बळीराम माळी ठरला तालुक्यात अव्वल  अहील्यानगर प्रतिनिधी:- (संपादक -:-हेमकांत...

 राहाता तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत रांजणखोल शाळेचे घवघवीत यश

बळीराम माळी ठरला तालुक्यात अव्वल 


अहील्यानगर प्रतिनिधी:-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे झालेल्या राहाता तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा रांजणखोल शाळेने वैयक्तिक क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.यात बळीराम अभिमन्यू माळी याने गोळा फेक मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.तर 

धावणे शर्यतीत वेदिका सुधीर ढोकचौळे हिचा तालुक्यात द्वितीय क्रमांक आला आहे. तसेच बळीराम अभिमन्यू माळी या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय उंच उडी,लांब उडी,धावणे शर्यत,तसेच गोळा फेक या वैयक्तिक स्पर्धा प्रकारांत जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.बळीराम अभिमन्यू माळी हा अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून वैयक्तिक स्पर्धेतील जवळ जवळ सर्वच स्पर्धा प्रकारात त्याने एवढे मोठे यश मिळवल्या बद्दल राहाता तालुक्यातील सर्व शिक्षक वर्गातून तसेच अधिकारी वर्गातून या विद्यार्थ्याचें भरभरून कौतुक केले जात आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सर्व आजी व माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सरपंच,ग्रामपंचायत सर्व सदस्य,पालक यांनी आभार मानले आहे.

No comments