आनंदराज जी आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्लारी नगरीत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकव...
आनंदराज जी आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्लारी नगरीत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
तक्षशिला बुद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी पूज्य भदंत धम्मसार थेरो यांच्या संयोजनातून रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे या धम्म परिषदेला मुख्य अतिथी म्हणून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज जी आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना हे उपस्थित राहणार आहेत. या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थान पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिकू संघ बुद्धगया बिहार हे असणार आहेत या धम्म परिषदेमध्ये पूज्य भदंत डॉक्टर यशपायन महाथेरो जयसिंगपूर ,पूज्य भदंत धम्मनाग महाथेरो हत्यार, पूज्य भदंत पैयातीसह महाथेरो शिरसाळा, पूज्य भदंत महाविरो थेरो काळेगाव, पूज्य भदंत पैय्यानंद थेरो लातूर, पूज्य भदंत धम्मशील थेरो, बीड, पूज्य भदंत धम्मवीरीवो थेरो मुंबई, पूज्य भदंत नागसेन बोधी उदगीर व वीस ते पंचवीस भिकू संघ उपस्थित राहून धम्मदेशना देणार आहेत.
या धम्म परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून औसा विधानसभेचे आमदार अभिमा न्यू पवार साहेब, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे, साहेब रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव प्राध्यापक युवराज धसवडीकर, रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते समाजभूषण वसंतराव कांबळे मुंबई, सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त मुंबई आयुष्यमान रमेश चक्रे रेणापूरकर, व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या धम्म परिषदेच्या स्वागत अध्यक्ष पदी किल्लारी ग्रामपंचायतचे उपसरपंच आयुष्यमान युवराज गायकवाड हे असणार आहेत या धम्म परिषदेत उपस्थित राहणाऱ्या उपासक आणि उपाशी का यांच्या भोजनाची व्यवस्था किल्लारी नगरातील शौकत भाई शेख यांच्या वतीने करण्यात आलेली आहे या धम्म परिषदेत सुमित गायकवाड प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम गायिका आयु. सुनिता ताई गायकवाड व आयु.प्रज्ञाताई गायकवाड लातूर या करणार आहेत.
तरी या धम्म परिषदेत किल्लारी परिसरातील श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपाशी का यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक पूज्य भदंत धम्मसार थेरो यांनी केले आहे.
No comments