adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य संचलन;'उडान जागृती रथ' ठरला मुख्य आकर्षण

  ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य संचलन;'उडान जागृती रथ' ठरला मुख्य आकर्षण अहिल्यानगर (दि.२६ जानेवारी):- (संपादक-:- हेमकांत गाय...

 ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य संचलन;'उडान जागृती रथ' ठरला मुख्य आकर्षण


अहिल्यानगर (दि.२६ जानेवारी):-

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात भव्य जिल्हास्तरीय संचलन पार पडले.या सोहळ्यात  पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्री. सिद्धाराम सालीमठ (भा.प्र.से.),जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक श्री. यशवंत डांगे,पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला आणि इतर जिल्हा प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.उडान जागृती रथने वेधले लक्ष

स्नेहालयच्या उडान प्रकल्पाने साकारलेल्या उडान जागृती रथने संचलनामध्ये विशेष आकर्षण निर्माण केले. बालविवाहमुक्त समाज घडवण्याचा संदेश देणाऱ्या या रथाद्वारे प्रेक्षकांना जागरूकतेचा नवीन दृष्टिकोन देण्यात आला.

‘उडान जागृती रथ'-सामाजिक बदलाची दिशा

स्नेहालय उडान प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू झालेला 'उडान जागृती रथ' हा जिल्ह्यातील बालविवाहमुक्ती मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे.या रथाद्वारे अहिल्यानगर जिल्हयातील १६०२ गावांमध्ये पथनाट्य, संवाद सत्रे,आणि विविध माध्यमांतून बालविवाहाच्या दुष्परिणामांवर प्रबोधन करण्यात येईल.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:

१)भव्य संचलन:- देशभक्तीने प्रेरित विविध विभागांचे सादरीकरण.

२)उडान जागृती रथचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते बालविवाहविरोधी मोहिमेला सुरुवात

३)प्रबोधन सादरीकरण:-ग्रामीण भागातील नागरिक आणि तरुणांसाठी पथनाट्याद्वारे जनजागृती

उडान प्रकल्पाच्या नेतृत्वाखालील योगदान 

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी,मानद संचालिका ॲड.बागेश्री जरंडीकर,आणि अनिवासी प्रकल्प संचालक श्री.हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम,शाहिद शेख,पूजा दहातोंडे, सीमा जुनी,निलेश सरोदे,रामदास काकडे, संदीप क्षीरसागर,जितेंद्र निकम आणि पथनाट्य टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. २०२७ पर्यंत बालविवाहमुक्त जिल्ह्याचा निर्धार स्नेहालय उडान प्रकल्पाने २०२७ पर्यंत अहिल्यानगर जिल्ह्याला बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या मोहिमेद्वारे मुलींसाठी शिक्षण, आरोग्य,आणि स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्यात येणार आहेत. ॲड.बागेश्री जरंडीकर म्हणाल्या की, 

“बालविवाह थांबवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.सामूहिक प्रयत्नांमुळे २०२७ पर्यंत अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त होईल.” प्रेरणादायी पाऊल उडान जागृती रथ’ जिल्ह्यातील बालविवाहविरोधी चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. प्रजासत्ताक दिनी सुरू झालेला हा उपक्रम भारतभर बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

No comments