जपायगो - आधार माता बाल आरोग्य प्रकल्प, आरोग्य दूत सन्मान चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जपायगो या जागतिक सामाजिक संस्थेच्या ...
जपायगो - आधार माता बाल आरोग्य प्रकल्प, आरोग्य दूत सन्मान
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जपायगो या जागतिक सामाजिक संस्थेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या उपक्रमात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आरोग्य दूतांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान सन्मान करण्यात आला
चोपडा जिल्हा जळगाव येथील अतिदुर्गम आदिवासी भागात माता बाल आरोग्य प्रकल्प आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या भागीदारी तून राबविला जात आहे.
आज दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या चोपडा तालुक्यातील सातपुडाच्या आदिवासी भागांमध्ये आपल्या आरोग्य विभागा मार्फत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य सेविका यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
तहसील कार्यालयातील शासकीय ध्वजारोहण समारंभा नंतर हा सोहळा आपल्या तालुक्याचे माननीय तहसीलदार भाऊसाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते करण्यात आला .
या समारंभाचे सत्कारमूर्ती उमर्टी उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. मोसे बारेला व कर्जाने उपकेंद्रातील आरोग्य सेविका विभांगिनी हुमणे यांना त्यांच्या उपकेंद्रांतर्गत आदिवासी भागात उत्कृष्ट सेवा तसेच सहकार्यबद्दल देण्यात आला. चोपडा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाने आपल्या भागात JHPIEGO या सामाजिक संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .याप्रसंगी या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रोग्रॅम ऑफिसर आम्रपाली मुरार मॅडम व उज्वल भगत उपस्थित होते. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर , चोपडा शहराचे पोलिस निरीक्षक एम. डी. साळवे सर व इतर मान्यवर उपस्थित होते. , या प्रसंगी आधार बहुउद्देशीय संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रोजेक्ट मॅनेजर दिपक संदानशिव, केअर नेविगेटर ज्ञानेश्वर सोनवणे, शिवा बारेला, प्रीती बारेला व निशांत कोळी आदींची उपस्थिती होती.

No comments