adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोबाईल मागवला ऑनलाइन , बॉक्समध्ये निघाले साबण.. ;डिलिव्हरी बॉयच निघाला सूत्रधार.

  मोबाईल मागवला ऑनलाइन , बॉक्समध्ये निघाले  साबण.. ;डिलिव्हरी बॉयच निघाला सूत्रधार. निंभोरा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या   रावेर  प्रतिनिधी मु...

 मोबाईल मागवला ऑनलाइन , बॉक्समध्ये निघाले  साबण.. ;डिलिव्हरी बॉयच निघाला सूत्रधार.

निंभोरा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या


 रावेर  प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी येथील सुनील दशरथ पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली की मी ॲमेझॉन कंपनीकडून ऑनलाइन मोबाईल १२५०० रुपये किमतीचा रियल मी कंपनीचा ५जी मोबाईल नारझो एन ५ सिरीज असा मोबाईल ऑर्डर केला. मात्र त्या ऐवजी ॲमेझॉन कंपनीचे पार्सल विभागात डिलिव्हरी विभागाचे कर्मचारी यांनी मोबाईलच्या बॉक्समध्ये फिर्यादीस दोन संतूर साबण व तीन लहान डेटॉल साबण देऊन त्याची फसवणूक केली त्यामुळे फिर्यादी यांनी ॲमेझॉन कंपनीच्या पार्सल विभाग व डिलेवारी बॉय कोणीतरी अज्ञात कर्मचारी यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने निंभोरा पोलीस ठाण्यात पी सी टी एन एस गु रं नं०१/२०२५ बी. एन.एस.का.क ३१६,३१६(४) प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली होती. याबाबतीत पोलिसांनी अधिक तपास केला असता डिलिव्हरी बॉयच निघाला. यासंदर्भात पोलिसांनी  विचारपूस करून व पोलिसी खाक्या दाखवत आरोपी रुकेश तुकाराम पाटील.वय३५ कडगाव ता: जि: जळगाव याचे कडून मोबाईल  सह एकूण ५२७४८रु किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात  पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग  यांच्या मार्गदर्शक निंभोरा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. हरिदास बोचरे पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे पो. ना .का.सुरेश भीमराव अडायगे यांनी  डिलिव्हरी बॉय रुकेश तुकाराम पाटील वय३५ राहणार कडगाव ता:जि: जळगाव यास अटक करून  सदर आरोपीस रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याचे निंभोरा पोलिसांनी माहिती दिली आहे.

No comments