प्रशासनातील जनसामान्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यात पत्रकारांची भुमिका महत्वपूर्ण - डीवाय एसपी अन्नपूर्णा सिंग रावेर पोलीसांनी केला पत्रका...
प्रशासनातील जनसामान्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यात पत्रकारांची भुमिका महत्वपूर्ण - डीवाय एसपी अन्नपूर्णा सिंग
रावेर पोलीसांनी केला पत्रकारांचा गौरव सन्मान सत्कार
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जैसवाल यांनी पत्रकार दिनानिमित्त रावेर पोलीस स्टेशन येथे पत्रकारांचा गौरव कौतुक सन्मान सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे आयोजक नरावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय डॉ विशाल जैसवाल पीएसआय मनोज महाजन पीएसआय तांबे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी ( डीवाय एसपी) अन्नपूर्णा सिंग उपस्थित होत्या अध्यक्षीय मार्गदर्शन करत त्यांनी बोलताना सांगितले
पत्रकारांचे बातमी लेखण सामाजिक जनजागृती चे सर्वोच्च माध्यम आहे समाजहितासाठी पत्रकार लेखणीतून जनमानसांच्या हक्कासाठी लेखणी रुपी लढा लढतात आणि न्याय मिळवून देतात जसे आम्ही पोलीस लाठीचा वापर करून गुन्हेगारी ला वठणीवर आणतो तसेच पत्रकार बांधव आपल्या लेखणी द्वारे सडेतोड लिखाण करीत अनेकांना वठणीवर आणण्याचे कार्य करत असतात
पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासन व जनता यांमधील दुवा आहे मागील कोरोना काळात पत्रकार बांधव यांनी जनजागृती करण्याचे उत्तम प्रशंशात्मक कार्य केल्याबद्दल त्यांनी पत्रकार यांचे कौतुक केले रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जैस्वाल पीएसआय मनोज महाजन साहेब पीएसआय तांबे यांनी नूतन वर्षात सुखी समृद्ध जीवनात सुगंध दरवळत राहावा या उदात्त हेतूने सुगंधी परफ्यूम गिफ्ट व गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जेष्ठ पत्रकार देवलाल पाटील, वासुदेव नरवाडे यांनी आभार पर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे रावेर पोलीस स्टेशन गौरव कौतुक सन्मान सत्कार सोहळ्याचे आयोजक रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जैस्वाल यांनी सायबर क्राईम, मोबाईलसह सोशल मिडिया द्वारे होणारी फसवणूकीपासून सुरक्षित कसे राहावे वाहतूक सुरक्षा सप्ताह कमी वयातील मुलांना मोबाइल सह सोशल मिडिया वापरा पासून प्रतिबंध अत्यावश्यक असून आळा घालण्यासाठी व १८ वर्षाखालील लहान मुलांना वाहन चालविण्यास वर्जित करण्यासाठी पत्रकार बांधवांनी आपली लेखणी व वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती प्रसिध्दी केल्यास नक्कीच यश मिळेल आणि यासर्व गोष्टींना आळा बसेल त्याबाबत पत्रकार बांधवांनी या विषयावर बातमीपत्र लिहीणे खूप महत्त्वाचे ठरेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी जेष्ठ पत्रकार देवलाल पाटील,प्रदीप वैद्य सर,दिपक नगरे, सुनिल चौधरी, प्रकाश चौधरी,शकील शेख, कुमार नरवाडे चंद्रकांत विचवे, वासुदेव नरवाडे,शालीक महाजन,प्रविण पाटील, संतोष कोसोदे, मुबारक तडवी, ईश्वर महाजन, प्रमोद सावकारे, निलेश महाजन अजीज शेख आदीसह पत्रकार बांधवांसह गोपनीय शाखेचे पो कॉ देशमुख,महाले उपस्थित होते

No comments