adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नूतन माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम लाडकी बहिण योजनाच्या नाट्य कलाकार विद्यार्थ्यांनी जिंकले उपस्थित प्रेक्षकांची मने

  नूतन माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम लाडकी बहिण योजनाच्या नाट्य कलाकार  विद्यार्थ्यांनी जिंकले उपस्थित प्रेक्षकांची मने  रावेर प्...

 नूतन माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम लाडकी बहिण योजनाच्या नाट्य कलाकार  विद्यार्थ्यांनी जिंकले उपस्थित प्रेक्षकांची मने 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 चिनावल ता. रावेर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात काल   सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गोपाळ पाटील तर प्रमुख पाहुणे सावदा पोलीस स्टेशनचे एपीआय विशाल पाटील साहेब हे होते . सुरुवातीला दीप प्रज्वलन व गणेश आरती होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापक एच आर ठाकरे यांनी प्रास्ताविक केले , प्रमुख पाहुणे एपीआय विशाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन होते व कलागुणांना वाव मिळतो असे ते म्हणाले . नंतर विद्यार्थ्यांनी लोकगीते ,फिल्मी गाणे, देशभक्तीपर गीते ,एकांकिका व विविध नाटके सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली .


 बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या मुला मुलांनी ४० विविध कार्यक्रम सादर केले. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीवेळी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेवरही विद्यार्थ्यांनी श्री एल एम ठाकूर सरांच्या मार्गदर्शनामुळे एकांकिका सादर केली  आणि प्रेक्षकाची मने जिंकली ,यावेळी पालक व ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते .अनेकांनी कार्यक्रमाला बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला .यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन ,उपाध्यक्ष राजेंद्र फालक ,चेअरमन विनायक महाजन तसेच सदस्य सुरेश गारसे ,अनिल किरंगे, किशोर बोरोले, दामोदर महाजन, खेमचंद्र पाटील, निळकंठ चौधरी ,उपमुख्याध्यापिका मीनल नेमाडे, पर्यवेक्षक पीएम जावळे तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम एस महाजन, पी. टी. सोनवणे,पी. बी. नाफडे,एल एम ठाकूर यांनी केले तर आभार डी आर नेहते यांनी मानले .

No comments