adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न

 जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न खलील तडवी बिडगाव/ हेमकांत गा...

 जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न


खलील तडवी बिडगाव/ हेमकांत गायकवाड चोपडा

(संपादक हेमकांत गायकवाड)

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यलय जळगांव येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व सहअध्यक्ष खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली.


यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचेमार्फत विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले,तसेच केंद्र सरकार पुरस्कृत योजना - प्रधानमंत्री पिक विमा योजना,प्रधानमंत्री आवास योजना,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,मध्यान्ह पोषण आहार योजना,राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना,अमृत योजना,रोजगार हमी,दीनदयाल विद्युतीकरण योजना,मूलभूत सुविधा प्रकल्प,डिजिटल इंडिया योजना,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,स्वच्छ भारत योजना,उज्वल अशुरंस योजना,सर्वशिक्षा योजना,एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन,राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरुस्कुत योजनांसह दूरसंचार,महामार्ग,रेल्वे,खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.


यावेळी बैठकीसकेंद्रीय राज्यमंत्री  रक्षाताई खडसे यांच्यासह वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,सहअध्यक्ष खासदार स्मिताताई वाघ,आमदार सुरेश(राजूमामा)भोळे,आमदार चंद्रकांत सोनवणे,आमदार अमोल चिमणराव पाटील,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित,मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.

No comments