पत्रकारांची धगधगती लेखणी प्रेरणादायी तसेच लग्न समारंभात डीजे वाद्य वाजविणे टाळा -सपोनि विशाल पाटील सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक-:-...
पत्रकारांची धगधगती लेखणी प्रेरणादायी तसेच लग्न समारंभात डीजे वाद्य वाजविणे टाळा -सपोनि विशाल पाटील
सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
पत्रकार हा प्रशासन आणि जनता यांमधील दुवा असून अन्याय ग्रस्तांना पत्रकारांकडून सुध्दा न्याय व सहकार्याची अपेक्षा असते तसेच लग्न समारंभात डीजे वाद्य मोठ्या कर्कश आवाजात वाजविणे टाळण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांनी आपल्या लेखनातून जनजागृती करण्याचे आवाहन सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले
तसेच पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ तर आहेच मात्र पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकार लेखणीतून पिडीतांच्या न्याय हक्कासाठी सदैव लेखन रुपी लढा लढून न्याय हक्क मिळवून देतात अशी अनेक उदाहरणे त्यांनी दिली सावदा येथील पोलीस स्टेशन तत्कालीन पीएसआय सध्या नेमणूक चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे सपोनि मनोज खडसे यांनी कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत उपस्थित पत्रकारांना कौतुक करीत भरभरून शुभेच्छा दिल्या
सावदा पोलीस स्टेशन येथे रेझींग डे मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजन करुन व पत्रकार दिनानिमित्ताने सावदा पोलीस हद्दीतील सर्व शहरी ग्रामीण भागातील पत्रकार यांचा सावदा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर स्मितभासी जनमानसांच्या ह्रदयात आपुलकीचे नाते निर्माण करणारे कार्यकुशल सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील साहेब पीएसआय अमोल गर्जे साहेब चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे साहेब व सावदा पोलीस स्टेशन कर्मचारी पोहेका निलेश बाविस्कर पोहेकॉ यशवंत टहाकळे पो कॉ मयुर पाटील यांनी उपस्थित पत्रकार बांधवांचा मोठ्या थाटात मानाची पगडी (फेटा) बांधून लेखणी गुलाब पुष्पगुच्छ लेखणी (पेन) भेट देऊन सत्कार केला व मनस्वी शुभेच्छा दिल्या पत्रकार बांधव अशा ना भुतो ना भविष्याती अशा पहिल्यांदाच झालेल्या सत्कार सोहळ्याने भारावून गेले प्रास्ताविक तसेच सुत्र संचालन पत्रकार प्रविण पाटील यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते


No comments