राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या रावेर तालुका अध्यक्ष पदी पूनमचंद जाधव तर उपाध्यक्ष हरलाल पवार नियुक्त रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-...
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या रावेर तालुका अध्यक्ष पदी पूनमचंद जाधव तर उपाध्यक्ष हरलाल पवार नियुक्त
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
पाल ता रावेर येथे बंजारा समाजाच्या सामाजिक, सास्कृतिक कार्यात उल्लेखनीय कार्य पाहता देशातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या रावेर तालुका अध्यक्ष पदी पाल येथील पूनमचंद जाधव तर उपाध्यक्ष पदी ताड जिन्सी येथील हरलाल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय बंजारा परिषद ही संघटना संपूर्ण तांडा वस्ती,शहरा मध्ये मोठे जाळे पसरलेले असून ही सामाजिक विचार देणारी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून धर्मसत्ता,साहित्य, राजसत्ता,या क्षेत्रावर विशेष लक्ष देऊन काम करीत आहे.या संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक किसन राठोड,राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भिकन जाधव यांच्या मार्गदर्शनातून दि २७ डिसेंबर रोजी संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष करतार राठोड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

No comments