नागरिकांची प्रलंबित कामे , समस्या तातडीने सोडवा तसेच विकास कामांना गती द्या - आमदार चंद्रकांत पाटील रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक ...
नागरिकांची प्रलंबित कामे , समस्या तातडीने सोडवा तसेच विकास कामांना गती द्या - आमदार चंद्रकांत पाटील
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर मतदार संघात समाविष्ट असलेल्या रावेर तालुक्यातील ४२ गावांच्या प्रलंबित विकासकामांसह नागरिकांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जातीने लक्ष देऊन जनसामान्यांच्या प्रलंबित प्रश्न व समस्या सोडवून विकास कामांना गती देण्याचे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील यांनी आदेश केले
रावेर येथील तहसील कार्यालयात महसूल , आरोग्य, सार्वजनिक बांधकाम,परिवहन महामंडळ महावितरण पशुसंवर्धन भुअभिलेख, यांसह सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती आढावा बैठकीत रावेरचे तहसीलदार बंडू कापसे तहसीलदार नायब संजय तायडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन गटविकास अधिकारी के पी वानखेडे रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील निंभोरा चे हरिदास बोचरे आदी उपस्थित होते
यावेळी नागरिकांनी रावेर येथील भू अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कामे करण्याच्या मोबदल्यात नागरिकांकडून पैशांची मागणी करतात असा प्रश्न उपस्थित केला त्याची आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची भ्रमणध्वनीवरून तक्रार करीत चौकशी करण्याचे सांगितले तसेच घरकुल बांधण्यासाठी योजनेचा निधी अतिशय कमी पडत
असून त्यात वाढ कडून अडीच लाख रुपयापर्यंत करण्याची नागरिकांनी मागणी केली त्याबाबत मी मुख्यमंत्री महोदयांची याविषयी चर्चा केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले तसेच तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानाबद्दल नागरिकांच्या समस्या उपस्थित नागरिकांनी केल्या यावर आमदार महोदयांनी तहसीलदार बंडू कापसे यांना त्या सोडविण्याचे सांगितले तसेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शेतकरी बांधव यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामसभेत ठराव करून त्या गावांचे प्रस्ताव तात्काळ तहसील कार्यालयात पाठविण्याचे आवाहन आ. चंद्रकांत पाटील यांनी केले
या समन्वय आढावा बैठकीत रावेर वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, रावेर बांधकाम विभागाचे उप अभियंता एम बी चौधरी, सावदा बांधकाम विभागाचे उप अभियंता व्ही एस तायडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, रावेर आगार प्रमुख पठाण, जिल्हा परिषद बांधकाम विभागचे अभियंता श्री इंगळे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष छोटू पाटील, लाडकी बहिण योजनेचे तालुका समन्वयक राहुल पाटील, भाजपचे हरलाल कोळी, डॉ दीपक साळुंखे, राहुल वपाटील, संजय माळी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी व नागरिक उपस्थित होते तसेच समन्वय आढावा बैठकीला अनुपस्थित अधिकारी कर्मचारी यांना नोटीस बजावण्याचेही मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर तहसीलदार बंडू कापसे यांना सांगितले सांगितले

No comments