भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ऑप क्रेडीट सोसायटी लिमीटेडमध्ये गैरव्यहार प्रकरणी फरार असलेला आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी. माणिक च...
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ऑप क्रेडीट सोसायटी लिमीटेडमध्ये गैरव्यहार प्रकरणी फरार असलेला आरोपी जेरबंद; एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी. माणिक चौधरी यांच्या पथकाला यश
अहिल्यानगर प्रतिनिधी:-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ऑप क्रेडीट सोसायटी लिमीटेड मध्ये गैरव्यहार प्रकरणी फरार असलेल्या आरोपीस एमआयडीसी पोलीस स्टेशन व सोनई पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत शिताफिने जेरबंद केले आहे.फिर्यादी नामे रोहीदास सदाशिव जाधव (वय-74 वर्ष धंदा-शेती रा.जेठर ता.जि.अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की,दि. 04/08/2022 ते दि.26/08/2024 रोजी वेळोवेळी यातील मुख्य आरोपी नामे भारत बबन पुंड,वैभव बाळासाहेब विधाते व त्यांचे साथीदार यांनी कट कारस्थान रचुन फिर्यादी व 350 पेक्षा जास्त ठेविदारांचा विश्वास संपादन करुन त्यांचे मल्टीस्टेट सोसायटीमध्ये चालु व बचत खाते उघडुन त्यांचेत रोख रकमा जमा करुन जास्त व्याज दर देतो रकमा दामदुप्पट देतो असे आमीष दाखवून ठेविदारांचे रोख रकमाचे ठेवी घेवुन डेली कलेक्शन द्ववारे रोख रकमा जमा करुन घेतल्या,त्यानतंर ठेवीदार यांनी त्यांचे पैशाची मागणी केली असता आरोपी नामे भारत बबन पुंड रा.बेलपिंपळगाव ता.नेवासा जि. अहिल्यानगर व इतर सहकारी यांनी 21 कोटी रुपयापेक्षा जास्त ठेवी लाभासह परत फेड न करता त्यांनी कपटपुर्व रितीने कसुर करुन त्यांचा विश्वास घात करुन आर्थिक फसवून केली व भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीची जेठर येथील शाखा बंद करुन फसवुन केली वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोस्टे गु.रजि. नंबर 667/2024 B.N.S.2023 चे कलम 316 (5), 318 (3),318(4), 61(2) सह MPII) कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा तपास करत असतांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचे अधारे माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे वैभव बाळासाहेब विधाते हा सोनई ता. नेवासा या ठिकाणी लपुवन बसला आहे. त्यावरुन सोनई पोलीसांचे मदतीने आरोपीस सापळा लावुन ताब्यात घेतले.त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव बाळासाहेब विधाते वय-33 वर्ष ता. जि. अहिल्यानगर असे सांगीतले. सदर आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे करीत आहेत.सदरची कामगिरी श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि माणिक बी.चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोहेकॉ.नितीन उगलमुगले,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/ सुरेश सानप,सोनई पोलीस स्टेशनचे सपोनि. विजय माळी,पोहेकॉ/ लबडे,पोना/तुपे/पोकॉ/प्रविण क्षिरसागर,दक्षिण मोबाईल सेल अहिल्यानगरचे पोकॉ/ राहुल गुंडू यांनी केली आहे.
No comments