Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस, मोटर सायकल शिताफईने पकडुन एकुण 1,36,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

  एक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस, मोटर सायकल शिताफईने पकडुन एकुण 1,36,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत  चोपडा प्रतिनिधी (संपादक...

 एक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस, मोटर सायकल शिताफईने पकडुन एकुण 1,36,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 31/01/2025 रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, यांनी गुप्तबातमीव्दारा मार्फत बातमी मिळाली की, लासुर ते हातेड रस्त्याने एक काळ्या रंगाची प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 ही येत असुन त्यावरील दोन इसम हे बेकायदेशीररित्या अवैध्य गावठी बनावटी कट्टा व जिवंत काडतुस वाहतुक करुन घेवुन जात आहे अशी बातमी मिळाल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, वपोलीस अंमलदार यांनी लासुर ते हातेड रोडवर पाटचारी जवळ दोन पंचासमक्ष जावुन सापळा लावुन दिनांक 31/01/2025 रोजी 18.44 वाजेचे सुमारास बजाज प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 अशी येतांना दिसल्याने सदर मोटर सायकल चालकास हाताचा इशारा देवुन थांबविले असता त्यावरील चालकास पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव 01) नौफील रब्बानी सैय्यद वय-22 वर्ष, रा. सैय्यद नगर हडपसर गल्ली नं 4(A), लिब्रा शाळेजवळ ता.जि. पुणे व त्यापाठीमागे बसलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव 2) अजय अशोक वाघमारे वय-24 वर्ष, रा. सलगर ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद, ह. मु. नेवाळे वस्ती चिखली ता.हवेली जि.पुणे असे सांगितले त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस असे मिळुन आल्याने त्याना सदर गावठी बनावटी हत्यार व जिवंत काडतुस कब्जात बाळगण्याचा परवाना आहे काय बाबत विचारणा केली असता त्यांचेकडे परवाना नसल्याचे सांगितल्याने इसम नामे 01) नौफील रब्बानी सैय्यद वय-22 वर्ष, रा. सैय्यद नगर हडपसर गल्ली नं 4 (A), लिब्रा शाळेजवळ ता.जि.पुणे 2) अजय अशोक वाघमारे वय-24 वर्ष, रा. सलगर ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद, ह. मु. नेवाळे वस्ती चिखली ता. हवेली जि. यांचेकडुन एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस, दोन मोबाईल फोन, 500/- रुपये रोख व बजाज प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 असे एकुण 1,36,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन उल्लेखनीय कामगीरी केली आहे.

सदर दोन्ही आरोपी हे एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस असे त्यांचे ताब्यातील मोटर सायकलने बेकायदेशीरित्या विनापरवाना वाहतुक करतांना मिळुन आल्याने पोकॉ/ विशाल पाटील यांचे फिर्याद वरुन चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आर्म अँक्ट कलम 3/25,7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, पोकॉ/ किरण पारधी हे वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री महेश्वर रेड्डी सो, अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा उपविभाग श्री अण्णासाहेब घोलप सो, पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण पो स्टे श्रीमती कावेरी कमलाकर सो यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, पोना/ शशिकांत पारधी, पोकॉ/  किरण पारधी, पोकॉ/  विशाल पाटील, पोकॉ/  चेतन महाजन अशांनी मिळून केली आहे

No comments