adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाभुळगाव येथे आज पासुन ३ दिवसीय संत श्री गजानन महाराज प्रकट दिवस सोहळ्याची सुरुवात बाभुळगाव येथील संत श्री गजानन महाराज भक्त परिवार जपत आहे अध्यात्मिक व धार्मिक वारसा

  बाभुळगाव येथे आज पासुन ३ दिवसीय संत श्री गजानन महाराज प्रकट दिवस सोहळ्याची सुरुवात बाभुळगाव येथील संत श्री गजानन महाराज भक्त परिवार जपत आह...

 बाभुळगाव येथे आज पासुन ३ दिवसीय संत श्री गजानन महाराज प्रकट दिवस सोहळ्याची सुरुवात

बाभुळगाव येथील संत श्री गजानन महाराज भक्त परिवार जपत आहे अध्यात्मिक व धार्मिक वारसा

उद्या शिवजयंती निमित्ताने कीर्तनाचे आयोजन 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचे एक भव्य व  दिव्य असे मंदिर असून या ठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे होत असते. सालाबादाप्रमाणेच याही वर्षी  संत श्री गजानन महाराज्यांचा १४७  प्रकट दिवस सोहळ्याचे आयोजन हे केलेले आहे.  संत श्री गजानन महाराज भक्त परिवार सर्व कार्यक्रम उत्सहात साजरे करत असतात. आज पासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाचे रूपरेषा पुढील प्रमाणे. आज सकाळी पहाटे ०५:०० वाजता श्रींच्या अभिषेक व पारायण ( पुरुष), सकाळी ०८ वाजून ३० मिनिटांनी आरती, ८ :२५  मिनिटांनी पारायण (महिला), दुपारी तीन वाजता पालखी सोहळा व संध्याकाळी 7 वाजता श्रींची आरती.

उद्या दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ०५:०० वाजता श्रींचे अभिषेक व पारायण नंतर सकाळी ०८:३० वाजता श्रींची आरती नंतर सकाळी ०९:०० वाजता (महिला) पारायण, संध्याकाळी ०६:०० वाजता श्रींची आरती संध्याकाळी ०७ वाजून ३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व पूजा, संध्याकाळी आठ वाजून तिस मिनिटांनी कीर्तन सोहळा चे आयोजन केलेले आहे. ह.भ.प. सुजित महाराज जळगावकर यांचे जाहीर व दणदणीत असे कीर्तनाचे आयोजन केलेले आहे. 

दिनांक २०/ २/ २०२५ गुरुवार रोजी पहाटे ०५:०० वाजता श्री च्या अभिषेक व पारायण (पुरुष) नंतर सकाळी ०८ वाजून ३० मिनिटांनी श्रींची आरती व सकाळी ०९:०० वाजता पारायण (महिला) तदनंतर संध्याकाळी ०५:०० वाजता श्रींची महाआरती होऊन  कार्यक्रम संपन्न होऊन संध्याकाळी ०६:०० वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल सर्व भक्तांनी महाप्रसादाच्या लाभ घ्यावा असे आवाहन संत श्री गजानन महाराज मंदिर बाभूळगाव यांनी केलेली आहे. 

              संत श्री गजानन महाराज यांच्या १४७ वा प्रकाश दिवस सोहळा हा उत्साहात संपन्न होत आहे महाराजांच्या प्रकट दिवसाच्या या आरतीच्या लाभाने भक्तांनी मनात ठेवलेली मनोकामना श्रींच्या चरणी अर्पण केल्यास भक्तांची मनोकामना १००% पूर्ण होते असे संत श्री गजानन महाराजांचे भक्तांनी अनुभव व्यक्त केले आहेत. संपूर्ण गावाने व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी आरतीच्या भंडाराच्या लाभ घ्यावा असे आवाहन संत श्री गजानन महाराज भक्त परिवार बाभुळगाव यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.

No comments