सी.बी.निकुंभ माध्यमिक विद्यालयात भरली विस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा. मच्छिंद्र कोळी गलंगी प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
सी.बी.निकुंभ माध्यमिक विद्यालयात भरली विस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा.
मच्छिंद्र कोळी गलंगी प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २००४/०५ मध्ये १० वी या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह-मेळावा संपन्न झाला. या स्नेह मेळाव्याला जवळ जवळ ५० ते ५५ माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दिली. तसेच अनेक आजी व माजी शिक्षक देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन मुख्याध्यापक श्री. पी. एच. महाजन सर यांना करण्यात आले.
कार्यक्रमात व्ही.ए.पाटील सर, ए.डी.कोळी सर, के. आर. सोनवणे सर, व्ही. ए. नागपूरे सर, आर. एन. अहिरे सर, एच.बी.मोतीराळे सर, आर. टी. सोनवणे सर, एस.एस. कापडणे मॅडम व सध्याचे मुख्याध्यापक श्री. आर.पी.चौधरी सर यांची उपस्थिती लागली. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती माता प्रतिमा पूजन करून गुरुवर्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या जुन्या आठवणी ताज्या करत आपले मनोगत व्यक्त केले. भरत कोल्हे, सचिन अहिरे, सुवर्णा पाटील, योगिता पाटील, मनोज चौधरी, दीपाली जैन, दीपिका पाटील, कुणाल पाटील, राजश्री पाटील, मुकेश शिरसाठ, एकनाथ भोई, मिथुन पारधी, जीवन सोनवणे, जिकिशा पाटील, तेजस्विनी सोनार या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेचे ऋण व्यक्त केले. व इतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. तसेच तत्कालीन शिक्षक जे आता आपल्याला सोडून गेले असे जोशी सर, प्रमोद ठाकरे सर, मगरे सर, पूनम भाऊसाहेब व मंगल कोळी या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शाळेला आठवण म्हणून सचिन अहिरे व सुवर्णा पाटील यांनी शाळेसाठी खास तयार केलेली ट्रॉफी भेट दिली तर योगिता पाटील हिने शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक मूर्ती भेट दिली. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विदयार्थ्यांनी सजवलेला या अलौकिक कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले व त्यांना आठवलेल्या आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमाला सर्वात आकर्षक बनविण्यासाठी ठरलेली बाब म्हणजे जितेंद्र धनगर याने केलेले सूत्रसंचालन ठरले. त्याने सूत्रसंचलन करत असताना तत्कालीन सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे स्वभाव अगदी मिश्किल शब्दात सांगत सगळ्यांना २० वर्ष आधीच्या काळात नेले व सर्वाना पोट धरून हसवत काही ठिकाणी भावनिक देखील केले. कार्यक्रमांची सांगता स्नेह भोजनाने झाली.

No comments