adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री भिमराज पावरा स्वलिखीत 'वातरा - आदिवासी पावरा संस्कृतीमधील पारंपरिक लोककथा' या पुस्तकाचे प्रकाशन .

 श्री भिमराज पावरा स्वलिखीत 'वातरा - आदिवासी पावरा संस्कृतीमधील पारंपरिक लोककथा' या पुस्तकाचे प्रकाशन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हे...

 श्री भिमराज पावरा स्वलिखीत 'वातरा - आदिवासी पावरा संस्कृतीमधील पारंपरिक लोककथा' या पुस्तकाचे प्रकाशन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

दि. २३ फेब्रुवारी रोजी आदिवासी पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळ धुळे अंतर्गत, प्रा. डाॅ. श्री. मोहन पावरा यांच्या अध्यक्षतेखाली एस. एस. व्ही. पी. एस. साहित्य व वाणिज्य महाविद्यालय धुळे येथे स्नेहसंमेलन भरवण्यात आले. सदर स्नेहसंमेलनात आदिवासी दैवत व क्रातीकारकांचे विधीवत पुजन करून आलेल्या पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. नंतर  वातरा - आदिवासी पावरा संस्कृतीमधील पारंपरिक लोककथा, भाषा- पावरी, भाग-१, या पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


     सदर स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. मनोज पवार (सेवानिवृत्त आयकर उप. आयुक्त) मा. प्रा. डॉ श्री. भरतसिंग पटले (सेवानिवृत्त प्राचार्य महाविद्यालय धुळे) मा. श्री.  गुलाबसिंग खर्डे (डी.वाय.एस.पी.SRP धुळे) मा.  श्री. मालसिंग पावरा (समाजकल्याण अधिकारी धुळे) यांची उपस्थिती लाभली होती. आदिवासी नारी शक्तीचा विजय होवो या हेतूने पारंपरिक वेशभूषेत उपस्थित असलेल्या महिलांचे देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारे युवा युवतीचे ही सत्कार करण्यात आला. 

    आदिवासी समाज प्रबोधन पर, मा. श्री अनारसिंग पावरा (जे.आर.सी.टी.हायस्कुल धुळे) यांनी आदिवासी युवा व युवतीच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडावी असा मोलांचा संदेश दिला. मा. श्री. दिपक पावरा ( ए.  पी. आय देवपूर, पोलीस स्टेशन धुळे) यांनी स्पर्धा परीक्षा, चालूघडामोडी, तसेच उच्च पदावर पोहण्यासाठी आपला संघर्ष कसा असावा याबाबत संदेश दिला. श्री. भिमराज पावरा ( लेखक, कवी, आदिवासी बोलीभाषा संवर्धन एवं साहित्य परिषद) यांनी शिक्षणामुळे आदिवासींचे परिवर्तन झाले त्यामुळे शिक्षणावर  जास्त भर घालावी. आदिवासी संकृती व साहित्य यांचा बचाव करणे  तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते देखील विविध प्रकारच्या विषयावर चर्चा केली. शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रा. श्री. मोहन पावरा यांनी आदिवासी समाज संघटीत राहून एकात्मतेचा संदेश द्यावा तसेच शिक्षण, रोजगार, बदलते जग, या विषयावर देखील भाष्य केले. आदिवासी पावरा समाजातील सर्व लेखक व कवी, साहित्यिक व समीक्षक यांना देखील पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. आदिवासी संस्कृती चे जतन करणे व साहित्य निर्माण करणे तसेच इतर लोकांनी देखील प्रत्येक साहित्याची दखल घ्यावी असा मोलांचा संदेश दिला. 

     सदर स्नेहसंमेलनात  मंडळाचे अध्यक्ष तानुराम पावरा, उपाध्यक्ष संजीव पावरा, सचिव मनोज ब्राह्मणे, पवन सुळे, रमेश पावरा, के के पावरा, रंजना पावरा, मुन्ना पावरा, नमीबाई पावरा, विलास पावरा, भाग्यश्री पावरा, संगीता पावरा, प्रदीप पावरा, गोविंद पावरा, तसेच सर्व कार्यकारीणी सदस्य व समस्त आदिवासी पावरा बारेला सहपरिवार उपस्थित होते. श्री. मनोज ब्राह्मणे यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच सदर स्नेहसंमेलनात सुत्रसंचालन श्रीम. अंबिका पावरा यांनी केले. अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाचा समारोप करून आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

No comments