गणेश सार्वजनिक वाचनालय वाचकांसाठी ज्ञानाचे भांडार - सौ.रजनी पाटील ईदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्री गणेश सार्वजनि...
गणेश सार्वजनिक वाचनालय वाचकांसाठी ज्ञानाचे भांडार - सौ.रजनी पाटील
ईदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय हे वाचकांसाठी ज्ञानाचे भांडार आहे. ज्येष्ठ वाचकांसह शालेय विद्यार्थी तसेच तरुणांनी या वाचनालयाचा आपल्या बौद्धिक विकासासाठी उपयोग करावा. दररोज एक तास मोबाईल कमी पाहून पुस्तके वाचावीत. जेणेकरून वाचन संस्कृती जिवंत राहील तसेच वाचन संस्कृतीचा विकास होईल. या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका सौ. रजनी पाटील यांनी न्हावी येथे केले.
श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ वाचकांच्या सत्कार प्रसंगी सौ. रजनी पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष हेमकांत गाजरे होते. वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठवाचक मुरलीधर धनगर, राजेंद्र बोरोले, सौ.रजनी पाटील श्रीमती प्रमिला इंगळे यांचा ग्रंथालयाकडून हात रुमाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वाचनालयाचे संचालक चेतन आनंद इंगळे यांची गावच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल आणि वाचनालयाचे संचालक ललित कुमार फिरके यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या राज्यसहसचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष शरद चोपडे ,सचिव युवराज तळले, संचालक प्रवीण वारके, नितीन चौधरी, गंगाराम वाघुळदे, मिलिंद बेंडाळे, ललित कुमार फिरके,चेतन इंगळे, ग्रंथपाल ललित इंगळे, सहग्रंथपाल सौ.कविता इंगळे ,भास्कर भोगे उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज तळले यांनी तर आभार मिलिंद बेंडाळे यांनी मानले.

No comments