सुकी नदीतून अवैध वाळू वाहतूक दोन ट्रॅक्टर पकडले रावेर तहसील ची कारवाई रावेर प्रतिनिधी -:- मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर ...
सुकी नदीतून अवैध वाळू वाहतूक दोन ट्रॅक्टर पकडले रावेर तहसील ची कारवाई
रावेर प्रतिनिधी -:- मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तहसील कार्यालयाच्या अखत्यारीतील सुकी नदी पात्रातील वडगाव-चिनावल नदीपात्रातून चोरटी अवैध विनापरवाना वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करताना रावेर तहसीलदार बंडू कापसे नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने अवैध वाळू उत्खनन उपसा करून वाहतूक करतांना समाधान गोविंदा पाटील ट्रॅक्टर क्रमांक MH 19 ΑΝ 5085, व विलास धनराज तायडे (विनाक्रमाक नसलेलं ट्रॅक्टर ) हे दोन ट्रॅक्टर पकडले सदरची कारवाई रावेर तालुका महसूल प्रशासनाच्या
संयुक्त पथकात मंडळ अधिकारी, श्री अनंत खवले, यासीन तडवी , रवि वानखेडे, प्रवीण वानखेडे, प्रवीण नेहते, मंडळ अधिकारी, रवि शिगणे, रशीद तडवी, सुधीर खरात, अभिजीत डांगे भाग्यश्री बर्वे, दिपाली बुंदेले, ग्राम महसुल अधिकारी, विकास माळी, महेंद्र चौधरी, गणेश चौधरी, सिद्धांत लोखंडे, तुषार चौधरी महसूल सेवक, शिपाई सुनिल सोनार यांनी अवैध गौण खनिज वाळू वाहतूकदारांवक्ष कारवाई केली.

No comments